सलमान खानच्या लग्नासाठी शाहरुख – गौरी एका मुलीच्या गेले होते घरी, पण…
Salman Khan : 'त्या' मुलीने होणार दिला असता तर, सलमान खान याला देखील असतं स्वतःचं कुटुंब... भाईजानच्या लग्नासाठी शाहरुख खान - गौरी यांनी देखील प्रयत्न केले पण...; सध्या सर्वत्र सलमान खान याच्या खासगी आयुष्याची चर्चा... अनेक वर्षानंतर सत्य समोर...
मुंबई : 30 ऑक्टोबर 2023 : अभिनेता सलमान खान आणि अभिनेता शाहरुख खान यांच्या मैत्रीबद्दल प्रत्येकाला माहिती आहे. काही वर्षांपूर्वी दोघांमध्ये काही वाद झाले होते, म्हणून अनेक वर्ष शाहरुख – सलमान यांच्यामध्ये अबोला होता. पण भांडण असताना देखील कधीही दोघे एकमेकांच्या विरोधात बोलले नाही. पण आता शाहरुख – सलमान पुन्हा सर्व वाद विसरुन एकत्र आले आहेत. सोशल मीडियावर देखील दोघांचे अनेक व्हिडीओ फोटो व्हायरल होत असतात. महत्त्वाची गोष्ट सलमान खान याचं देखील वैवाहिक आयुष्य सुरु व्हावं म्हणून शाहरुख आणि गौरी खान यांनी प्रयत्न केले होते. पण त्यांच्या प्रयत्नांना फळ मिळालं नाही.
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतं आहे. सलमान खान याच्या ‘दस का दम’ शोमधील एक व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. शोमध्ये एका एपिसोडमध्ये अभिनेत्री राणी मुखर्जी हिच्यासोबत शाहरुख खान देखील आला होता. शोमध्ये शाहरुख, सलमान, राणी प्रचंड धम्माल केलं.
दरम्यान शाहरुख म्हणाला, ‘सलमान खान याच्या लग्नासाठी मी गौरीसोबत एका मुलीच्या घरी गेलो होतो.. पण काहीही होवू शकलं नाही…’ महत्त्वाची गोष्ट म्हणजे, शाहरुख खान याने ‘त्या’ मुलीचं नाव सांगितलं नाही. सध्या सर्वत्र शाहरुख आणि सलमान यांची चर्चा रंगत आहे.
सलमान खान याच्या खासगी आयु्ष्याबद्दल सांगायचं झालं, भाईजान सध्या लुलिया वंतूर हिला डेट करत असल्याची चर्चा रंगत आहे. पण आम्ही फक्त चांगले मित्र आहोत… असा खुलासा सलमान याने केला. अनेक ठिकाणी लुलिया आणि सलमान एकत्र दिसतात.
लुलिया हिच्या आधी देखील सलमान खान याचं नाव बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींसोबत जोडण्यात आलं. अभिनेत्री संगिता बिजलानी, कतरिना कैफ, ऐश्वर्या राय… यांच्यासोबत देखील सलमान खान रिलेशनशिपमध्ये होता. पण कोणासोबत देखील भाईजानचं नातं लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही… वयाच्या 57 व्या वर्षी देखील अभिनेता सर्वकाही असून एकटा आयुष्य जगत आहे.
सलमान खान याचं नातं अनेक अभिनेत्रींसोबत जोडण्यात आलं. पण ऐश्वर्या राय हिच्यासोबत असलेल्या नात्याची चर्चा आजही चाहत्यांमध्ये रंगलेली असते. सलमान खान याच्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर ऐश्वर्या हिने अभिनेता अभिषेक बच्चन याच्यासोबत लग्न करुन नव्या आयुष्याला सुरुवात केली.
सलमान खान याचा आगामी सिनेमा
सलमान खान लवकरच ‘टायगर ३’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमात सलमान खान याच्यासोबत कतरिना कैफ महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. अभिनेता इमरान हश्मी सिनेमात खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. सिनेमाचा ट्रेलर देखील प्रदर्शित झाला आहे. आता चाहते सिनेमाच्या प्रतीक्षेत आहेत.