Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shah Rukh Khan | प्रदर्शनापूर्वीच शाहरुखच्या ‘डंकी’चा डंका; कमावले तब्बल इतके कोटी रुपये

दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांनी 'संजू', 'थ्री इडियट्स', 'पीके', 'मुन्नाभाई एमबीबीएस', 'लगे रहो मुन्नाभाई' यांसारख्या दमदार चित्रपटांचं दिग्दर्शन केलंय. त्यामुळे त्यांच्या 'डंकी' या चित्रपटाकडून प्रेक्षकांना खूप अपेक्षा आहेत.

Shah Rukh Khan | प्रदर्शनापूर्वीच शाहरुखच्या 'डंकी'चा डंका; कमावले तब्बल इतके कोटी रुपये
शाहरुख खानImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jul 09, 2023 | 6:24 PM

मुंबई : या वर्षातील धमाकेदार आणि ब्लॉकबस्टर चित्रपट ‘पठाण’ प्रदर्शित झाल्यानंतर आता चाहत्यांना शाहरुख खानच्या इतर चित्रपटांची प्रतीक्षा आहे. सध्या किंग खान दोन मोठ्या प्रोजेक्ट्सवर काम करतोय. त्यापैकी पहिला ‘जवान’ हा चित्रपट येत्या 7 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. तर दुसऱ्या चित्रपटाचं नाव आहे ‘डंकी’. या चित्रपटाच्या निमित्ताने शाहरुखसोबत दिग्दर्शक राजकुमार हिरानी काम करत आहेत. हा चित्रपट ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. मात्र प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटाने दमदार कमाई केल्याची माहिती समोर येत आहे.

शाहरुख खानच्या डंकी या चित्रपटाने प्रदर्शनाआधीच 155 कोटी रुपये कमावल्याची माहिती समोर येत आहे. या चित्रपटाचे ओटीटी हक्क मुकेश अंबानी यांच्या रिलायन्सच्या जियो सिनेमाला इतक्या मोठ्या रकमेला विकले गेले आहेत. फक्त हिंदी भाषेत प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटांमध्ये ही आता पर्यंतची सर्वात मोठी डील असल्याचं म्हटलं जातंय.

दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांनी ‘संजू’, ‘थ्री इडियट्स’, ‘पीके’, ‘मुन्नाभाई एमबीबीएस’, ‘लगे रहो मुन्नाभाई’ यांसारख्या दमदार चित्रपटांचं दिग्दर्शन केलंय. त्यामुळे त्यांच्या ‘डंकी’ या चित्रपटाकडून प्रेक्षकांना खूप अपेक्षा आहेत. राजकुमार हिरानी आणि शाहरुख खान ही दोन्ही नावं मोठी असल्याने हा चित्रपट जगभरात चर्चेत येईल यात काही शंका नाही. इतकंच नव्हे तर डंकी हा बॉक्स ऑफिसवरील कमाईचे सर्व विक्रम मोडणार असंही म्हटलं जातंय. या चित्रपटाच्या निमित्ताने जवळपास पाच वर्षांनंतर राजकुमार हिरानी हे दिग्दर्शक म्हणून पुनरागमन करत आहेत.

हे सुद्धा वाचा

राजकुमार हिरानी हे त्यांच्या प्रत्येक चित्रपटातून काही ना काही संदेश देण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे डंकीमधूनही हते खास संदेश देणार आहेत. याशिवाय शाहरुखचा ‘जवान’ हा चित्रपटसुद्धा सोशल मीडियावर चर्चेत आहे. लवकरच या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये शाहरुखसोबत दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा झळकणार आहे.

दरम्यान शाहरुख खानला लॉस एंजिलिसमध्ये शूटिंगदरम्यान दुखापत झाल्याचं वृत्त कळताच चाहत्यांनी त्याच्या प्रकृतीविषयी काळजी व्यक्त केली. आगामी एका प्रोजेक्टसाठी शूटिंग सुरू असताना त्याच्या नाकाला दुखापत झाल्याची माहिती होती. नाकातून रक्तस्राव होऊ लागल्याने त्याला तातडीने तिथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि नाकावर सर्जरी झाल्याचं म्हटलं गेलं होतं. या चर्चांदरम्यान नुकतंच शाहरुखला मुंबई विमानतळावर पाहिलं गेलं. बुधवारी पहाटे शाहरुख मुंबईत परतला आणि यावेळी तो नेहमीप्रमाणे फिट अँड फाइन दिसत होता.

केस गळतीनंतर आता नख गळती; बुलढण्यात चाललंय काय?
केस गळतीनंतर आता नख गळती; बुलढण्यात चाललंय काय?.
ठाकरेंची सेना सिल्व्हर ओकच्या कचराकुंडीत..., शिवसेनेच्या नेत्याची टीका
ठाकरेंची सेना सिल्व्हर ओकच्या कचराकुंडीत..., शिवसेनेच्या नेत्याची टीका.
जागरण गोंधळातील जेवणातून 79 जणांना विषबाधा
जागरण गोंधळातील जेवणातून 79 जणांना विषबाधा.
‘तुम मराठी लोग गंदा...’, मुंबईत पुन्हा मराठी माणसाचा अपमान, घडलं काय?
‘तुम मराठी लोग गंदा...’, मुंबईत पुन्हा मराठी माणसाचा अपमान, घडलं काय?.
धनंजय मुंडेंचा शिरूर कासारचा दौरा रद्द, ट्विट करून दिली माहिती
धनंजय मुंडेंचा शिरूर कासारचा दौरा रद्द, ट्विट करून दिली माहिती.
'शिंदेंना त्या विमानातून उतरवलंय, आता ते ट्रेनचे....', राऊतांनी डिवचलं
'शिंदेंना त्या विमानातून उतरवलंय, आता ते ट्रेनचे....', राऊतांनी डिवचलं.
'जो बिरोबाचा नाही झाला..', संभाजी ब्रिगेडकडून पडळकरांवर पलटवार
'जो बिरोबाचा नाही झाला..', संभाजी ब्रिगेडकडून पडळकरांवर पलटवार.
पहिल्यांदाच धस-मुंडे एकत्र, नामदेव शास्त्री एकाच वाक्यात म्हणाले...
पहिल्यांदाच धस-मुंडे एकत्र, नामदेव शास्त्री एकाच वाक्यात म्हणाले....
बेडकासारख्या उड्या मारत आलेले आम्हाला शिकवणार का?
बेडकासारख्या उड्या मारत आलेले आम्हाला शिकवणार का?.
बारमध्ये डान्स अन् हातात रायफल... PSI रणजीत कासलेंचा व्हिडीओ व्हायरल
बारमध्ये डान्स अन् हातात रायफल... PSI रणजीत कासलेंचा व्हिडीओ व्हायरल.