राहुल गांधी यांच्या ‘त्या’ प्रश्नावर किंग खान म्हणाला… ‘टेबला खालून पैसे घेवू नका’
राहुल गांधी यांच्या एका प्रश्नावर किंग खान याचं उत्तर, व्हिडीओ पाहून तुम्ही देखील म्हणाल... अभिनेता शाहरुख खान याच्याकडे आहेत सर्व प्रश्नांची उत्तर... चाहत्यांचा देखील अभिनेत्याला पाठिंबा
मुंबई : अभिनेता शाहरुख खान कायम त्याच्या सेन्स ऑफ ह्यूमरमुळे चर्चेत असतो. अभिनेत्याकडे प्रत्येक प्रश्नाची उत्तरं असतात. एका कार्यक्रमात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शाहरुख खानला एक प्रश्न विचारला, ज्याचं अभिनेत्याने उत्तर दिल्यानंतर चाहते देखील आनंदी झाले. सध्या राहुल गांधी आणि शाहरुख खान यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओ फार जुना असला तरी, सोशल मीडियावर शाहरुखने दिलेल्या उत्तराची चर्चा रंगत आहे. २००८ सली झालेल्या एका कार्यक्रमात राहुल गांधी यांनी शाहरुखला विचारलं, ‘तुला राजकारणी व्यक्तींनी कोणता सल्ला द्यायला आवडेल…’ यावर अभिनेता म्हणाला, ‘एवढा सोपा प्रश्न विचारण्यासाठी आनंदी आहे…’
पुढे अभिनेता म्हणाला, ‘मला असं वाटतं, प्रत्येक राजकारणी व्यक्तीने जर एका सल्ल्याचं पालन केलं तर, आपला देश प्रगती करेल. मी अनेक शो करतो. खरं तर माझ्या आयुष्यात काहीही ठोस नाही. पण जे लोक कोणत्याही स्वार्थाशिवाय देशाचं रक्षण करत आहेत, त्यांचा मी आदर करतो… मी त्या प्रत्येक व्यक्तीचा आदर करतो ज्यांची देशसाठी काम करण्याची इच्छा असते…’
राहुल गांधी यांनी विचारलेल्या प्रश्नावर किंग खान पुढे म्हणाला, ‘टेबला खालून पैसे घेवू नका. चांगलं काम करा. जर प्रत्येकाने योग्य मार्गाने काम केलं तर, प्रत्येक जण पैसे कमावू शकतो. प्रत्येक जण आनंदी होईल आणि एक महान आणि गौरवशाली राष्ट्र आपण घडवू शकू… हाच माझा प्रत्येक राजकारणी व्यक्तीला सल्ला आहे…’ असं अभिनेता म्हणाला.
View this post on Instagram
सध्या शाहरुख खानचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. शिवाय अनेक नेटकऱ्यांनी देखील किंग खानला पाठिंबा दिला आहे. शाहरुख कायम महत्त्वाच्या मुद्द्यांवर स्वतःचं मत मांडताना दिसत आहे. किंग खानच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.
गेल्या काही दिवसांपासून शाहरुख ‘पठाण’ सिनेमामुळे चर्चेत आहे. २५ जानेवारी रोजी प्रदर्शित झालेल्या ‘पठाण’ सिनेमाने प्रदर्शनानंतर तीन दिवसांत जगभरात अनेक नवीन विक्रम रचले. आजही पाठण सिनेमाची चर्चा चाहत्यांमध्ये रंगलेली असते. ‘पठाण’ सिनेमानंतर किंग खान ‘जवान’ सिनेमात देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे.