Shah Rukh Khan च्या ‘मन्नत’ बंगल्यावर जमणार प्रसिद्ध सेलिब्रिटींची गर्दी, कारण तुम्हाला माहितीये?
Shah Rukh Khan : शाहरुख खान आणि अभिनेत्याच्या चाहत्यांसाठी 2 नोव्हेंबर अत्यंत खास दिवस... 'मन्नत' बंगल्यावर जमणार प्रसिद्ध सेलिब्रिटींची गर्दी, कारण...; सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त किंग खान याची चर्चा... गुरुवारी का आहे खास दिवस?
मुंबई : 1 नोव्हेंबर 2023 : अभिनेता शाहरुख खान याने आतापर्यंत अनेत सिनेमांध्ये भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं. “झिरो” सिनेमानंतर चार वर्ष अभिनेता बॉलिवूडपासून दूर होता. 2023 मध्ये अभिनेत्याने चार वर्षांनंतर ‘पठाण’ सिनेमाच्या माध्यमातून दमदार पदार्पण केलं. २५ जानेवारी रोजी प्रदर्शित झालेल्या ‘पठाण’ सिनेमाने चाहत्यांचं भरभरुन मनोरंजन केलं. यंदाच्या वर्षातील सर्वात जास्त कमाई करणारा किंग खान याचा ‘पठाण’ सिनेमा ठरला. ‘पठाण’ सिनेमानंतर ‘जवान’ सिनेमाने देखील बॉक्स ऑफिसवर मोठी मजल मारली.. आता अभिनेत्याच्या ‘डंकी’ सिनेमाची चर्चा रंगली आहे..
सध्या शाहरुख खान आगामी ‘डंकी’ सिनेमामुळेच नाही तर, त्याच्या वाढदिवसामुळे देखील चर्चेत आला आहे. उद्या म्हणजे गुरुवारी बॉलिवूडच्या किंग खान याचा वाढदिवस आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त किंग खान याच्या वाढदिवसाची चर्चा रंगली आहे. चाहत्यांसह सेलिब्रिटी देखील किंग खान याच्या वाढदिवसासाठी उत्सुक आहेत.
मीडियारिपोर्टनुसार, शाहरुख खान याच्या वाढदिवसानिमित्त ‘मन्नत’ बंगल्यावर भव्य पार्टीचं आयोजन करण्यात आलं आहे. किंग खान याच्या वाढदिवसाचं निमित्तसाधत ‘डंकी’ सिनेमाचा टीझर प्रदर्शित करण्यात येणार आहे. रिपोर्टनुसार, यंदाच्या वर्षी शाहरुख खान याच्या सिनेमांनी देशातच नाही तर, जगभरात नवीन विक्रम रचले.. म्हणून किंग खान याचा वाढदिवस मोठ्या थाटात साजरा होणार आहे.
किंग खान याच्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये, करण जेहर, आलिया भट्ट, काजोल, दीपिका पादुकोन, राजकुमार हिरानी, एटली, सिद्धार्थ आनंद यांसारखे अनेक सेलिब्रिटी उपस्थित राहणार आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त शाहरुख खान याच्या वाढदिवसाची चर्चा रंगली आहे.
रिपोर्टनुसार, शाहरुखच्या वाढदिवसाची सुरुवात ‘डंकी’ सिनेमाच्या टीझरच्या रिलीजने होणार आहे. किंग खान याचा वाढदिवस असल्यामुळे त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची ‘मन्नत’बाहेर गर्दी जमेल.. यात काही शंकाच नाही. एवढंच नाही तर, बीकेसी, वांद्रे येथे देखील अभिनेत्याच्या वाढदिवसाचं आयोजन करण्यात आलं आहे.
किंग खान याच्या वाढदिवसासाठी उत्सुक आहे. सोशल मीडियावर देखील किंग खान याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. शाहरुख खान देखील चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सोशल मीडियावर कायम सक्रिय असतो. सोशल मीडियावर देखील शाहरुख याच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.