‘पठाण’ सिनेमासाठी Shah Rukh Khan ने किती घेतलं मानधन? अभिनेत्याच्या ट्विटमुळे सत्य उघड

जगातील चौथा श्रीमंत अभिनेता शाहरुख खानने 'पठाण' सिनेमासाठी किती घतलं मानधन? चाहत्याच्या प्रश्नाला किंग खानचं उत्तर

'पठाण' सिनेमासाठी Shah Rukh Khan ने किती घेतलं मानधन? अभिनेत्याच्या ट्विटमुळे सत्य उघड
'पठाण' सिनेमासाठी Shah Rukh Khan ने किती घेतलं मानधन? अभिनेत्याच्या ट्विटमुळे सत्य उघड
Follow us
| Updated on: Jan 13, 2023 | 8:07 AM

Shah Rukh Khan : अभिनेता शाहरुख खान (shah rukh khan) सध्या आगामी सिनेमा ‘पठाण’ सिनेमामुळे तुफान चर्चेत आहे. ‘पठाण’ (shahrukh khan pathan) सिनेमातील ‘बेशर्म रंग’ गाण्यात अभिनेत्री दीपिका पादुकोनने घातलेल्या भगव्या बिकिनीमुळे सिनेमा वादाच्या भोवऱ्यात आडकला होता. आता २५ जनेवारी रोजी ‘पठाण’ मोठ्या पडद्यावर दाखल होणार आहे. पण त्याआधी सिनेमा आणि कलाकारांबाबत अनेक चर्चा रंगत आहे. शाहरुख कायम सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतो. आता देखील अभिनेत्याने चाहत्यांच्या एका प्रश्नाचं उत्तर ट्विटच्या माध्यमातून दिलं आहे.

आस्क मी एनिथिंग सेशन दरम्यान एका युजरने अभिनेत्याला ‘पठाणसाठी किती फी घेतली? ‘ असा प्रश्न विचारला. या प्रश्नावर शाहरुखने देखील मजेशीर उत्तर दिलं आहे. सध्या युजरला अभिनेत्याने दिलेलं उत्तर सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे. एवढंच नाही तर, किंग खानचं ट्विट तुफान व्हायरल देखील होत आहे.

‘पठाणसाठी किती फी घेतली? ‘ असा प्रश्न विचारल्यानंतर अभिनेता उत्तर देत म्हणाला, ‘का साईन करायचा आहे आगामी सिनेमा?’ शाहरुख या उत्तरामुळे सध्या तुफान चर्चेत आहे. दरम्यान, १० जानेवारी रोजी सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर चाहते सिनेमाच्या प्रतीक्षेत आहेत. ट्रेलरला चाहत्यांनी मोठी पसंती दिली आहे.

मीडियारिपोर्ट्स नुसार, ‘पठाण’ सिनेमातील ‘बेशर्म रंग’ गाण्यावर होणारा विरोध पाहता सेंसर बोर्डाने सिनेमातील काही सिनवर कात्री चालवली असून सिनेमात महत्त्वाचे बदल केले आहेत. सिनेमा २५ जानेवारी रोजी मोठ्या पडद्यावर दाखल होणार आहे.

जगातील श्रीमंत अभिनेत्यांच्या यादीत शहरुख खान

८ जानेवारी रोजी प्रसिद्ध झालेल्या यादीमध्ये शाहरुखचं नाव समोर आलं आहे. वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सच्या ट्विटर अकाउंटवरुन यादी जाहिर करण्यात आली आहे. ज्यामध्ये शाहरुख चैथ्या स्थानी आहे.

वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सच्या रिपोर्टनुसार, शाहरुख खान याच्याकडे ७७० मिलियन डॉलर म्हणजे भरतीय रुपयानुसार ६६ हजार ३०० कोटी रुपयांची संपत्ती आहे.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.