गौरी हिच्या आधी दिल्लीमध्ये होती शाहरुख खानची गर्लफ्रेंड; तिच्यासोबत फिरणं अभिनेत्याला पडलं महागात
गौरी खान हिच्या आधी देखील किंग खान याच्या आयुष्यात होती एक तरुणी; खुद्द शाहरुख खान याने केला मोठा खुलासा... किंग खान याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल
Shah Rukh Khan : ‘हम एक बार जीते हैं, एक बार मरते हैं, शादी भी एक बार होती है, और प्यार भी एक ही बार होता है…’ हा डायलॉग अभिनेता शाहरुख खान याच्या ‘कुछ कुछ होता है’ सिनेमातील आहे. आता शाहरुख खान याच्या आयुष्यात फक्त आणि फक्त पत्नी गौरी खान असली, तर किंग खानवर अनेक जण प्रेम करतात. आता गौरी शिवाय शाहरुख याच्या आयुष्यात दुसरं कोणी नसलं तरी, एक काळ असा होता जेव्हा दिल्लीमध्ये अभिनेता एका तरुणीसोबत फिरायचा. हा किस्सा खुद्द अभिनेत्याने विनोदवीर कपिल शर्मा याच्या ‘द कपिल शर्मा शो’मध्ये सांगितला आहे.
सध्या किंग खानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. कपिलने शाहरुखला विचारलं दिल्लीमध्ये कधी मुलींकडे पाहिलं आहे, यावर अभिनेता म्हणाला, ‘दिल्लीत राहणाऱ्या प्रत्येकाचा हा हक्क आहे.पण माझ्यासोबत काही गोष्टी अशा झाल्या ज्यामुळे मी मुलींकडे पाहणं कमी केलं.’
View this post on Instagram
पुढे अभिनेता म्हणाला, ‘मी ग्रीन पार्कमध्ये होते. नवीन गर्लफ्रेंड बनवली होती. तिच्यासोबत फिरत होतो. तेव्हा काही गुंड आले आणि मला विचारलं कोण आहे.. तेव्हा माझं पण इंग्रजी शाळेत शिक्षण झाल्यामुळे मी इंग्रजीत म्हणाला माझी गर्लफ्रेंड आहे. ते म्हणाले भाभी.. मी म्हणालो नाही गर्लफ्रेंड.. त्यानंतर त्यांनी मला मरलं. आता जर कधी मी पत्नीसोबत दिल्लीमध्ये गेलो आणि कोणी मला विचारलं कोण आहे, तर मी सांगतो भाभी आहे…’ सध्या किंग खान याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
सध्या किंग खान त्याच्या ‘पठाण’ सिनेमामुळे तुफान चर्चेत आहे. सांगायचं झालं तर, ‘पठाण’ सिनेमातून शाहरुख खान याने तब्बल ४ वर्षांनंतर रुपेरी पडद्यावर पुन्हा पदार्पण केल्यामुळे चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. अभिनेत्याला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते सिनेमागृहात एकच गर्दी करत आहेत. सिनेमाने जगभरात तब्बल १०२६ कोटी रुपयांचा गल्ला जमा केला असून भारतात ५२८.८९ कोटी रुपयांपर्यंत मजल मारली आहे.
‘पठाण’ सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वी आणि प्रदर्शित झाल्यानंतर देखील सिनेमाच्या टीमने ‘पठाण’चं प्रमोशम केलं नाही. फक्त किंग खान सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात होता. आस्क एसआरके सेशनच्या माध्यामातून अभिनेत्याने चाहत्यांच्या प्रश्नाचं उत्तर विनोदी अंदाजात दिलं.