शाहरुख खान पाकिस्तानसाठी निष्ठावंत? आरोपांवर किंग खान म्हणाला, ‘मुसलमान असल्यामुळे…’

Shah Rukh Khan | शाहरुख खान पाकिस्तानसाठी निष्ठावंत? मुलांच्या नावांबद्दल देखील प्रश्नचिन्ह उपस्थित... आरोपांवर किंग खानने सोडलं मौन; म्हणाला, 'मुसलमान असल्यामुळे...', सध्या सर्वत्र फक्त आणि शाहरुख खान आणि त्याच्यावर करण्यात आलेल्या आरोपांची चर्चा...

शाहरुख खान पाकिस्तानसाठी निष्ठावंत? आरोपांवर किंग खान म्हणाला, 'मुसलमान असल्यामुळे...'
Follow us
| Updated on: Mar 16, 2024 | 9:10 AM

मुंबई | 16 मार्च 2024 : अभिनेता शाहरुख खान याच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. किंग खानची एक झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतात. चाहत्यांमध्ये आपली क्रेझ निर्माण करणारा शाहरुख अनेकदा वादाच्या भोवऱ्यात देखील अडकला आहे. अशात जेव्हा किंग खानचा सिनेमा प्रदर्शित होणार असतो, तेव्हा अभिनेता स्पष्ट वक्तव्य करताना दिसतो… एकदा शाहरुख खान पाकिस्तानसाठी निष्ठावंत असल्याचे आरोप अभिनेत्यावर करण्यात आले होते.

9/11 अमेरिकेत झालेल्या हल्ल्यानंतर शाहरुख खान याने मुसलमान असल्यामुळे देशात त्याच्यासोबत होत असलेल्या वागणुकीबद्दल मोठं वक्तव्य केलं होतं. तेव्हा शाहरुख याने स्वतःच्या मनातील खंत बोलून दाखवली होती आणि ज्यामुळे अभिनेता वादाच्या भोवऱ्यात अडकला होता.

शाहरुख खान म्हणाला होता, ‘मुसलमान असल्यामुळे मझ्याकडे संशयाने पाहिलं जात होतं. असं अनेकदा झालं आहे मी माझ्या शेजारच्या राष्ट्रासोबत निष्ठावंत आहे. याच गोष्टीमुळे मला अनेक नेत्यांनी देश सोडून जाण्यासाठी सांगितलं होतं. जेथे माझं खरं घर आहे तेथे जाण्यासाठी मला सांगितलं जात होतं.’

हे सुद्धा वाचा

पुढे किंग खान म्हणाला होता, ‘मुद्दाम मुलांची हिंदू नावे ठेवली आहेत, ज्यामुळे मुलांच्या धर्माची माहिती समोर येऊ नये…’ अशा अनेक प्रकरणांमुळे शाहरुख खान वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. शाहरुख खान कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो.

शाहरुख खान गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे. अभिनेत्याच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. गेल्या काही वर्षांपासून अभिनेता बॉलिवूडपासून दूर होता. पण 2023 मध्ये अभिनेत्याने ‘पठाण’ सिनेमाच्या माध्यमातून चार वर्षांनंतर पुन्हा बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं नाही.

‘पठाण’ सिनेमानंतर किंग खान ‘जवान’ आणि ‘डंकी’ सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस आला… शाहरुख खानची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी देखील चित्रपटगृहात मोठी गर्दी केली. सोशल मीडियावर देखील अभिनेत्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात.

चाहते आता शाहरुख खान याच्या आगामी सिनेमाच्या प्रतीक्षेत आहेत. सोशल मीडियावर देखील किंग खान कायम सक्रिय असतो. आक्सएसआरकेच्या माध्यमातून शाहरुख खान चाहत्यांसोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न करत असतो. एवढंच नाहीतर, मुलाखतींमध्ये अभिनेता स्वतःच्या कुटुंबाबद्दल देखील अनेक गोष्टी सांगत असतो.

Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.