‘D’Yavol X च्या जॅकेटची किंमत 1000-2000 करा…?’, चाहत्याच्या प्रश्नावर किंग खानचं मजेदार उत्तर
आर्यन खान याच्या 'D'Yavol X ब्रॅन्डच्या कपड्यांची किंमत फार मोठी... कपड्यांची किंमत कमी करण्यासाठी चाहत्याची शाहरुख खान याला विनंती... अभिनेत्याने दिलं मजेदार उत्तर

मुंबई : अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याने नुकताच स्वतःचा एक क्लोदिंग ब्रॅन्ड सुरु केला आहे. आर्यन खान याच्या क्लोदिंग ब्रॅन्डचं नाव D’Yavol X असं आहे. ब्रॅन्ड लॉन्च झाल्यानंतर शाहरुख आणि आर्यनच्या चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असतानाच काही लोक कपड्यांची किंमत पाहून आश्चर्यचकितही झाले आहेत. आर्यन खान याच्या ब्रॅन्डचे कपडे प्रचंड महाग आहेत. नुकताच, आर्यन खान याच्या क्लोदिंग ब्रॅन्डवर अनेक मीम्स देखील व्हायरल झाले होते. अशात ‘जवान’ सिनेमाचं पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर अभिनेत्याने आस्क एसआरके या सेशनच्या माध्यमातून चाहत्यांसोबत संवाद साधला. यावेळी चाहत्यांनी D’Yavol X ब्रॅन्डच्या किंमतीबद्दल देखील शाहरुख खान याला विचारलं.
आस्क एसआरके सेशनच्या माध्यमातून एका चाहत्याने शाहरुख खान याला विचारलं, ‘D’Yavol X चे जॅकेट 1000-2000 किंमतीत देखील तयार करा… ते जॅकेट खरेदी करण्यात घर निघून जाईल…’ चाहत्याच्या प्रश्नावर अभिनेत्याने मजेदार उत्तर दिलं आहे. ‘हे ‘D’Yavol X वाले लोक मला देखील स्वस्त विकत नाहीत… काही तरी करतो…’ पुढे अभिनेत्याने हॅशटॅगमध्ये जवान असं लिहिलं आहे…
सांगायचं झालं तर, आर्यन खान याच्या लक्जरी ब्रॅन्डचं कलेक्शन ३० एप्रिल रोजी लॉन्च झाला आहे . ज्यामध्ये प्रत्येत जॅकेटची किंमत २ लाख रुपयांचा जवळपास आहे… महत्त्वाचं म्हणजे इतके महागजे कपडे असताना देखील काही तासांत पूर्ण कलेक्शनची विक्री झाली… ही गोष्ट थक्क करणारी आहे. सध्या सर्व शाहरुख खान आणि आर्यन खान याच्या ‘D’Yavol X ब्रॅन्डची चर्चा रंगत आहे.
कपड्यांचा ब्रॅन्ड सुरू होण्यापूर्वी आर्यनने एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता, ज्यामध्ये आर्यनचे वडील शाहरुख खान देखील त्याच्यासोबत दिसला. आर्यनच्या पोस्टवर अनेकांनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला. एवढंच नाही तर, अनेक सेलिब्रिटी आणि चाहत्यांना आर्यन याला नव्या प्रवासासाठी शुभेच्छा देखील दिल्या.
आर्यन याच्या Dyavol X या क्लोदिंग ब्रॅन्डची किंमत अधिक असली तरी, त्या चाहत्यांना प्रचंड आनंद झाला आहे. आर्यन खान अभिनेता नसला तरी त्याच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. सोशल मीडियावर आर्यन खान याच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. शिवाय त्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असत. उद्योग क्षेत्रात उतरल्यानंतर आर्यन कधी बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.