शाहरुख खानचा लग्नात दमदार डान्स, किंग खाननं किती घेतलं मानधन?
Shahrukh Khan: लग्नात नवरीच्या सौंदर्यचं कौतुक करताना दिसला शाहरुख खान, अभिनेत्याच्या दमदार डान्सची चर्चा, लग्नात हरज राहण्यासाठी किंग खानने किती घेतलं मानधन? सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त शाहरुख खान याची चर्चा...
Shahrukh Khan: अभिनेता शाहरुख खान याला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. शाहरुख खान याच्या चाहत्यांची संख्या फक्त भारतातच नाही तर, परदेशात देखील फार मोठी आहे. सध्या किंग खान याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये शाहरुख खान एका लग्नात डान्स करताना दिसत आहे. अभिनेत्याला लग्नात परफॉर्म करताना पाहिल्यानंतर लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत. शाहरुख खान याने लग्नात हजर राहण्यासाठी आणि डान्स करण्यासाठी किती पैसे घेतले… असा प्रश्न देखील चाहते विचारत आहेत. ज्यावर नवरीच्या मेकअप आर्टिस्टने मौन सोडलं आहे.
सांगायचं झालं तर, सेलिब्रिटींना कायम लग्नात परफॉर्म करण्यासाठी बोलावलं जातं. ज्यासाठी सेलिब्रिटी तगडं मानधन घेतात. आता शाहरुख लग्नात हजर राहिल्याने अभिनेत्याने मोठी रक्कम आकारली असेल… असं देखील नेटकरी म्हणत आहे.
नुकताच, शाहरुख खान दिल्लीतील एका लग्नात शानदार परफॉर्मन्स देताना दिसला. त्यानंतर त्याची परफॉर्मन्स फी लोकांमध्ये चर्चेचा विषय बनली होती. पण समोर येत असलेल्या माहितीनुसार, अभिनेता नव्या जोडप्याचा कौटुंबिक मित्र असल्याचं समोर आलं आहे.
View this post on Instagram
नवरीच्या मेकअर आर्टिस्टने शाहरुख खान याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. व्हिडीओवर अनेक प्रतिक्रिया येत आहे. व्हिडीओमध्ये शाहरुख खान नवरीच्या सौंदर्याचं कौतुक करताना दिसला. तर, नव्या जोडप्याचा कौटुंबिक मित्र असल्यामुळे अभिनेत्याने कोण्याही प्रकारचं मानधन घेतलं नाही… अशी माहिती देखील समोर येत आहे.
व्हिडीओमध्ये शाहरुख खान ‘पठाण’ आणि ‘छय्या – छय्या’ गाण्यावर डान्स करताना दिसला. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त शाहरुख खान याच्या व्हिडीओची चर्चा रंगली आहे. व्हिडीओ चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.
शाहरुख खान याच्या आगामी सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेता लवकरच ‘किंग’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमात अभिनेता लेक सुहाना खान हिच्यासोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. चाहते देखील अभिनेत्याच्या आगामी सिनेमाच्या चर्चेत आहे.