मन्नतमध्ये कशी राहते सुहाना खान ? लेकीचे फोटो पाहून किंग खान याने सांगितलं सत्य
शाहरुख खान याने सुहानाचा एक फोटो पाहिल्यानंतर सांगितलं, ती मन्नतमध्ये कशी राहते; किंग खानच्या वक्तव्यामुळे सुहाना चर्चेत
मुंबई : अभिनेता शाहरुख खान कायम त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतो. शाहरुख त्याच्या खासगी आयुष्यातील अनेक छोट्या-मोठ्या गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत असतो. किंग खान कधी पत्नी गौरी खान हिच्याबद्दल सांगतो, तर कधी मुलांबद्दल अनेक गोष्टी चाहत्यांसोबत मनमोकळेपणाने शेअर करतो. अता शाहरुख याने लेक सुहाना खान हिच्याबद्दल मोठं सत्य सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना सांगितलं आहे. सुहाना सध्या एका कार्यक्रमासाठी दुबई येथे होती. कार्यक्रमादरम्यानचे काही फोटो सुहाना हिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केले आहेत.
फोटोमध्ये सुहाना प्रचंड हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे. असं एकदाही झालं नाही, सुहाना हिने पोस्ट केलेल्या फोटोवर शाहरुख खान याने कमेंट केली नसेल. आता देखील लेकीच्या फोटोवर किंग खान याने खिल्ली उडवणारी कमेंट केली आहे. सध्या किंग खानच्या कमेंटमुळे सुहाना चर्चेत आली आहे.
View this post on Instagram
सुहानाच्या फोटोवर शाहरुख कमेंट करत म्हणाला, ‘प्रचंड सुंदर बेबी… तू घरामध्ये जो पजामा घातले, त्याच्या पूर्ण विरुद्ध दिसत आहेस…’ सुहानाच्या फोटोवर शाहरुखने केलेली कमेंट सध्या चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे. सुहानाच्या फोटोवर फक्त शाहरुखच नाही, तर शनाया कपूर आणि अनन्या पांडे यांनी देखील कमेंट केली आहे.
सुहाना खानच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, सुहाना लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करणार आहे. सुहाना झोया अख्तर दिग्दर्शित ‘द अर्चिज’ सिनेमात दिसणार आहे. सिनेमात सुहाना शिवाय अन्य स्टारकिड्स देखील झळकणार आहेत.
‘द अर्चिज’ सिनेमात महानायक अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा, बोनी कपूर यांची मुलगी खुशी कपूर देखील झळरणार आहेत. सिनेमा नेटफ्लिक्सवर प्रदर्शि होणार आहे. सध्या सर्वत्र स्टारकिड्सच्या सिनेमाची चर्चा रंगत आहे.