Shah Rukh Khan | अलाना पांडेच्या लग्नात शाहरुख खानचा गौरीसोबत डान्स; व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव

अनन्याची बहीण अलाना ही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे. इन्स्टाग्रामवर तिचा मोठा चाहतावर्ग आहे. त्यावर तिने दहा लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. तिचा होणारा पती आयव्हर मॅक्रे हा दिग्दर्शक आहे.

Shah Rukh Khan | अलाना पांडेच्या लग्नात शाहरुख खानचा गौरीसोबत डान्स; व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव
Shah Rukh Khan and Gauri KhanImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Mar 19, 2023 | 3:07 PM

मुंबई : अभिनेत्री अनन्या पांडेची चुलत बहीण अलाना पांडे हिचा लग्नसोहळा धूमधडाक्यात पार पडला. बॉयफ्रेंड आयव्हर मॅक्रेशी तिने लग्नगाठ बांधली. 16 मार्च रोजी पार पडलेल्या या लग्नाला बॉलिवूडमधील बऱ्याच सेलिब्रिटींनी हजेरी लावली. अलानाच्या रिसेप्शन पार्टीतील काही व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यातील एका व्हिडीओने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. कारण अलानाच्या रिसेप्शन पार्टीत बॉलिवूडचा बादशाह अर्थात अभिनेता शाहरुख खानने पत्नी गौरीसोबत ठेका धरला आहे. शाहरुख आणि गौरीच्या या डान्स व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये शाहरुखने काळ्या रंगाचा सूट घातला आहे. तर गौरीने हिरव्या रंगाचा गाऊन परिधान केला आहे. पंजाबी गायक ए. पी. ढिल्लनच्या गाण्यावर या दोघांनी ठेका धरला आहे. अलानाची आई डियाने पांडेसुद्धा त्यांच्यासोबत दिसली. हे तिघं जण एकमेकांचा हात पकडून डान्स करताना पहायला मिळत आहेत. आणखी एका व्हिडीओमध्ये शाहरुख नवविवाहित दाम्पत्याला आशीर्वाद देताना आणि त्यांची गळाभेट घेताना दिसत आहे.

हे सुद्धा वाचा

गौरी-शाहरुखचा डान्स

अलाना पांडेच्या लग्नसोहळ्याला शाहरुख खान, गौरी खान, आर्यन खान, महिमा चौधरी, जॅकी श्रॉफ यांसह बऱ्याच सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. सोशल मीडियावर अलाना आणि आयव्हरच्या लग्नाचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत.

कोण आहे अलाना पांडे?

अनन्याची बहीण अलाना ही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे. इन्स्टाग्रामवर तिचा मोठा चाहतावर्ग आहे. त्यावर तिने दहा लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. तिचा होणारा पती आयव्हर मॅक्रे हा दिग्दर्शक आहे. हे दोघं गेल्या बऱ्याच वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. विशेष म्हणजे अभिनेता, निर्माता सोहैल खानच्या घरी हा मेहंदीचा कार्यक्रम पार पडला. चिक्की पांडे आणि सोहैल खान हे एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत, असं म्हटलं जातं. त्यामुळे सोहैलच्या घरी मेहंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.