shah rukh khan याच्या लेकीसोबत कायम राहणारा ‘तो’ कोण? सर्वत्र त्याचीच चर्चा

सुहाना खान हिच्यासोबत कायम राहणारा 'तो' आहे तरी कोण? यापूर्वी अनेक सेलिब्रिटींसोबत त्याला करण्यात आलं स्पॉट... सध्या सर्वत्र शाहरुख खान याच्या लेकीची चर्चा...

shah rukh khan याच्या लेकीसोबत कायम राहणारा 'तो' कोण? सर्वत्र त्याचीच चर्चा
Follow us
| Updated on: Apr 24, 2023 | 12:19 PM

मुंबई : सध्या सेलिब्रिटींपेक्षा स्टार किड्सची चर्चा तुफान रंगत आहे. अभिनेत्री आलिया भट्ट, सारा अली खान, जान्हवी कपूर यांच्या पाठोपाठ अभिनेता शाहरुख खान याची मुलगी सुहाना खान देखील लवकरच मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. अभिनेत्री म्हणून स्वतःचं स्थान सुहानाने अद्याप भक्कम केलेलं नाही, तरी देखील तिची चर्चा तुफान रंगत असते. सध्या ‘पठाण’ स्टार शाहरुखच्या लेकीची आणि तिच्यासोबत कायम असणाऱ्या एका व्यक्तीची तुफान चर्चा रंगत आहे. सुहाना हिच्यासोबत असणारा दणकट व्यक्ती आहे तरी कोण? अशी चर्चा सोशल मीडियावर तुफान रंगत आहे. नुकताच सुहाना हिला त्या व्यक्तीसोबत मुंबई विमानतळावर स्पॉट करण्यात आलं. ज्यामुळे त्या व्यक्तीची चर्चा तुफान रंगत आहे.

शाहरुख याची लेक सुहाना हिच्यासोबत दिसणार व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून तिचा बॉडीगार्ड आहे. सुहानाच्या सुरक्षेची जबाबदारी बॉडीगार्डच्या खांद्यावर आहे. सुहानाच्या बॉडिगार्डचं नाव दीपक सिंग असं आहे. याआधी देखील दीपक सिंग याने इंडस्ट्रीमधील अनेक सेलिब्रिटींच्या सुरक्षेची जबाबदारी चोखपणे पार पाडली आहे. तर सुहानाचा बॉडिगार्ड नक्की आहे तरी कोण? हे आज जाणून घेवू.

हे सुद्धा वाचा

मुंबई विमानतळावरील Deepak Singh आणि सुहाने यांचे अनेक फोटो समोर आले आहेत. फोटोमध्ये दीपक ‘बॉडीगार्ड’ सिनेमातील अभिनेता सलमान खान याच्यासारखाच दिसत आहे. सोशल मीडियावर सर्वत्र सुहानाच्या बॉडीगार्डची चर्चा रंगत आहे. सुहाना खान हिचा बॉडीगार्ड आग्रा येथील राहणारा आहे. रिपोर्टनुसार, दीपक सिंग अभिनेता रॉनित रॉय याचा मेहुणा आहे.

१९९९ मध्ये दीपक सिंग आग्राहून मुंबईत आला. मायानगरीत आल्यावर त्यांचं स्वप्न क्रिकेटर होण्याचं होतं. त्याने भारतीय क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक चंद्रकांत पंडित यांच्याकडून प्रशिक्षणही देखील घेतलं. सुहाना खानचा बॉडीगार्ड कायम क्रिकेटर बनण्याचे स्वप्न पाहत होता. तो एक ट्रेंड क्रिकेटर देखील आहे. पण नशीबाला काही वोगळचं मान्य होतं.

दीपक सिंग आज क्रिकेटपटू नसून बॉलिवूडमधील प्रसिद्ध बॉडीगार्ड आहे. सुहाना खानपूर्वी दीपक सिंगने दीपिका पदुकोण, रणबीर कपूर ते कतरिना कैफ अशा प्रसिद्ध अभिनेत्रींची सुरक्षा सांभाळली आहे. कतरिना कैफ हिच्या लग्नात देखील दीपक अभिनेत्रीसोबत होता. आता दीपक शाहरुख खान याच्या लेकीचं रक्षण करत आहे.

सुहाना खान तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर देखील सुहानाच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. सुहाना लवकरच ‘द अर्चिज’ सिनेमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे.

'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी.
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले...
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले....
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक.
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?.
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?.
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य.
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण.
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?.
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ.
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी.