Suhana Khan: शाहरुखची लेक अमिताभ बच्चन यांच्या नातूच्या प्रेमात; कुटुंबीयांसमोर रिलेशनशिप केलं Official?

झोया अख्तरच्या 'द आर्चीज' या चित्रपटाच्या सेटवर दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. सेटवरही दोघं एकमेकांसोबत बराच वेळ घालवायचे. इतरांपासूनही ही गोष्ट लपली नव्हती.

Suhana Khan: शाहरुखची लेक अमिताभ बच्चन यांच्या नातूच्या प्रेमात; कुटुंबीयांसमोर रिलेशनशिप केलं Official?
Suhana Khan: शाहरुखची लेक अमिताभ बच्चन यांच्या नातूच्या प्रेमातImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jan 06, 2023 | 2:52 PM

मुंबई: बॉलिवूड स्टार्समधील अफेअरच्या चर्चा नेहमीच ऐकायला मिळतात. यात आता स्टारकिड्सच्या अफेअरची चर्चा समोर येत आहे. हे दोघं स्टारकिड्स बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास सज्ज झाले आहेत. ही नवी जोडी आहे शाहरुख खानची मुलगी सुहाना खान आणि अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्या नंदा यांची. ‘द आर्चीज’ या चित्रपटातून ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र त्याआधीच अफेअरच्या चर्चांमुळे हे दोघं प्रकाशझोतात आले आहेत.

कपूर कुटुंबीयांनी गेल्या वर्षी ज्या ख्रिसमस पार्टीचं आयोजन केलं होतं, तिथे अमिताभ बच्चन यांचा नातू, म्हणजेच श्वेता नंदाचा मुलगा अगस्त्या नंदाने हजेरी लावली होती. अगस्त्या हा राज कपूर यांची मुलगी ऋतू नंदा यांचा नातू आहे. कपूर कुटुंबीयांसमोर अगस्त्याने सुहानाची ओळख पार्टनर म्हणून करून दिल्याचं कळतंय.

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Agastya nanda (@agastya_1_2)

झोया अख्तरच्या ‘द आर्चीज’ या चित्रपटाच्या सेटवर दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. सेटवरही दोघं एकमेकांसोबत बराच वेळ घालवायचे. इतरांपासूनही ही गोष्ट लपली नव्हती. ख्रिसमस पार्टीच्या निमित्ताने अगस्त्याने कुटुंबीयांसमोर हे नातं ‘ऑफिशिअल’ करण्याचं ठरवलं.

अगस्त्याची आई श्वेतालाही या नात्याविषयी आधीच माहिती होती, असं म्हटलं जातंय. इतकंच नव्हे तर श्वेताला आधीपासूनच सुहाना आवडायची, असंही समजतंय. त्यामुळे तिच्याकडून दोघांच्या रिलेशनशिपला हिरवा कंदील आहे. मात्र या सर्व चर्चांवर अद्याप सुहाना किंवा अगस्त्याकडून दुजोरा मिळालेला नाही.

काही काळापूर्वी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान आणि अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा यांचंही नाव जोडलं गेलं होतं. हे दोघं एकाच शाळेत शिकायचे. मात्र नव्याने नंतर स्पष्ट केलं की दोघं चांगले मित्र आहेत.

झोया अख्तरच्या ‘द आर्चीज’ या चित्रपटातून बॉलिवूडमधील तीन स्टार किड्स पदार्पण करणार आहेत. सुहाना खान , श्रीदेवीची धाकटी मुलगी खुशी कपूर आणि अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा हे यातून पदार्पण करत आहेत.

आर्ची आणि त्याच्या मित्रमैत्रिणी यांच्यातील खास मैत्री या चित्रपटात दर्शविण्यात येणार आहे. यामध्ये अगस्त्य हा आर्चीची भूमिका साकारणार आहे. तर खुशी बेट्टीच्या भूमिकेत आहे. सुहाना खान ही वरोनिकाची भूमिका साकारणार आहे. यासोबतच चित्रपटात डॉट, मिहिर अहुजा, वेदांग रैना आणि युवराज मेंदा यांच्याही भूमिका आहेत.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.