Shah Rukh Khan च्या लेकीच्या एका ड्रेस किंमत थक्क करणारी; जाणून व्हाल हैराण
Shah Rukh Khan : कपड्यांवर लाखो रुपये खर्च करते अभिनेता शाहरुख खान याची लेक सुहाना खान; एका ड्रेसची किंमत ऐकून व्हाल थक्क... सुहाना खान हिने अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. पण आता तिच्या रॉयल लाईफ स्टाईलमुळे चर्चेत आली आहे.
मुंबई | 13 नोव्हेंबर 2023 : बॉलिवूडचा किंग खान म्हणजे अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) कायम चाहत्यांमध्ये कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. फक्त शाहरुखच नाही तर, अभिनेत्याची लेक सुहाना खान (suhana khan) देखील गेल्या काही दिवसांपासून तुफान चर्चेत आहे. सुहाना बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख भक्कम करण्यासाठी सज्ज झाली आहे. सुहाना लवकरच ‘द अर्चिस’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार. पण सध्या सुहाना हिच्या अभिनयामुळे नाही तर रॉयल लाईफस्टाईलमुळे चर्चेत आली आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सुहाना हिच्या महागड्या वस्तूंची चर्चा आहे.
बॉलिवूडच्या किंग खानची लेक कपड्यांवर लाखो रुपये खर्च करते. सुहाना हिला कायम वेग-वेगळ्या लूकमध्ये स्पॉट केलं जातं. आता देखील सुहाना हिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. फोटोमध्ये सुहाना ज्या ड्रेसमध्ये तो ड्रेस प्रचंड महागडा आहे. सुहाना हिच्या काळ्या रंगाच्या ड्रेसवर लाल रंगाची फुलं आहेत.
सुहाना हिने घातलेल्या ड्रेसचं नाव अधिकृत वेब साईटवर ‘डोल्से गब्बाना’ आहे. ‘डोल्से आणि गब्बाना’च्या मिडी ड्रेसला सिल्क ब्लँडने बनवलं आहे. अधिकृत साईटवर सुहाना हिच्या ड्रेसची किंमत 1 लाख 95 हजार रुपये आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सुहाना हिच्या ड्रेसची चर्चा रंगत आहे.
सुहाना हिच्या आगामी प्रोजेक्टबद्दल सांगायचं झालं तर, सुहाना लवकरच दिग्दर्शक झोया अख्तर दिग्दर्शित ‘द अर्चिस’ सिनेमाच्या माध्यमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे. सुहाना सिनेमाबद्दल अनेक महत्त्वाचे अपडेट सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांपर्यंत पोहोचवत असते. सुहानाचा सिनेमा 7 डिसेंबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.
एवढंच नाही तर, सुहाना बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहर याच्या आगामी सिनेमात झळकणार असल्याची देखील चर्चा रंगत आहे. या वर्षाच्या अखेरीस या सिनेमाचं चित्रीकरण सुरु होईल असं चित्र दिसत आहे. पण याबद्दल कोणीही अधिकृत घोषणा केलेली नाही. चाहते देखील सुहाना हिला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहेत.
सुहाना सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. अद्याप अभिनेत्री म्हणून प्रसिद्धी झोतात आली नसली तरी, सुहाना हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. सोशल मीडियावर देखील सुहाना हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सुहाना कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.