Shah Rukh khan | ‘एवढ्या मुली कशाला सर?’, चाहत्याच्या प्रश्नावर शाहरुख खान याचं लक्षवेधी उत्तर

Shah Rukh khan | 'एवढ्या मुली कशाला सर?' असं का म्हणाला किंग खान याचा चाहता? चाहत्यांचं प्रश्नावर उत्तर देत अभिनेत्याने दिला मोठा सल्ला... सध्या सर्वत्र शाहरुख खान याच्या सोशल मीडिया पोस्टची चर्चा

Shah Rukh khan | 'एवढ्या मुली कशाला सर?', चाहत्याच्या प्रश्नावर शाहरुख खान याचं लक्षवेधी उत्तर
Follow us
| Updated on: Sep 10, 2023 | 10:10 AM

मुंबई : 9 सप्टेंबर 2023 | अभिनेता शाहरुख खान सध्या ‘जवान’ सिनेमामुळे चर्चेत आहे. ७ सप्टेंबर रोजी प्रदर्शित झालेला ‘जवान’ सिनेमा बॉक्स ऑफिसवर नवीन विक्रम रचताना दिसत आहे. सिनेमाने तीन दिवसांत तब्बल २०० कोटी रुपयांचा गल्ला जमा केला आहे. किंग खान याला पाहण्यासाठी चाहते चित्रपटगृहात गर्दी करताना दिसत आहेत. अशात शाहरुख देखील चाहत्यांचे आभार मानन्यासाठी एकही संधी सोडत नाही. सोशल मीडियाच्या माध्यामातून किंग खान चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत आहे. चाहत्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तर शाहरुख खान याने किंग खानच्या अंदाजात देत आहे. आता देखील अभिनेत्याने चाहत्यांच्या एका प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. अभिनेत्याची सोशल मीडिया पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर चाहत्याने शाहरुख खान याला विचारलं, ‘एवढ्या मुली कशाला सर?’ चाहत्यांचं प्रश्नाचं उत्तर देत किंग खान म्हणाला, ‘ते सगळं का मोजत आहेस… माझा लूक मोज ना…. मनात प्रेम आणि सन्मान ठेवा… आई आणि मुलींचा सन्मान करा आणि भविष्याकडे पाहा…’ सध्या अभिनेत्याने दिलेलं लक्षवेधी उत्तर सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

अभिनेता शाहरुख खान स्टारर ‘जवान’ सिनेमात अनेक अभिनेत्री महत्त्वाच्या भूमिकेतून चाहत्यांच्या भेटीस आल्या आहेत. अभिनेत्री दीपिका पादुकोण, नयनतारा याच्यासोबत सान्य मल्होत्रा, गिरीजा ओक, प्रियामणी, रिद्धी डोगरा, संजीता भटाचार्य, ऋतुजा शिंदे या अभिनेत्री महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. सध्या सर्वत्र ‘जवान’ सिनेमाची चर्चा रंगत आहेत.

जवान सिनेमाची कमाई

रिपोर्टनुसार, तिसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी ‘जवान’ सिनेमाने देशात जवळपास ७४.५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. यामध्ये ६६ कोटी हिंदी भाषा, ५ कोटी तमिळ आणि ३.५ कोटी तेलुगू भाषेचा समावेश आहे. अशात तीन दिवसांत सिनेमाने २०० कोटी रुपयांचा गल्ला पार केल्यामुळे किंग खान याने वेगळा विक्रम रचला आहे.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.