शाहरुख खान याला 50 हजार चाहत्यांकडून भेट; बादशाहच्या खास दिवसासाठी तयारी सुरु
पठाण सिनेमामुळे वादाच्या भोवऱ्या अडकलेल्या किंग खाल मिळतंय चाहत्यांचं भरभरुन प्रेम; अभिनेत्याला ५० हजार चाहत्यांकडून खास भेट, सर्वत्र शाहरुख खानची चर्चा
मुंबई : अभिनेता शाहरुख खान सध्या ‘पठाण’ सिनेमामुळे तुफान चर्चेत आहे. ‘पठाण’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर चाहते सिनेमाच्या प्रतीक्षेत आहेत. 25 जानेवारी रोजी सिनेमा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. पण सिनेमाप्रदर्शनापू्र्वी शाहरुखच्या चाहत्यांनी तयारी सुरु केली आहे. ‘पठाण’ सिनेमासाठी ५० हजार चाहत्यांनी फर्स्ट डे-फर्स्ड शोसाठी बुकिंग सुरु केली आहे. सध्या सर्वत्र ‘पठाण’ सिनेमाची चर्चा रंगत आहे. अनेक कारणांमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेला सिनेमा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार असल्यामुळे चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे.
शाहरुख खान जवळपास चार वर्षांनी बॉलिवूडमध्ये पुन्हा पदार्पण करणार असल्यामुळे चाहते आनंदी आहेत. मिळालेल्या माहितीनुसार तब्बल ५० हजार चाहत्यांनी पहिला शो पाहण्यासाठी गर्दी केली आहे. भारतात २०० पेक्षा अधिक शहरांमध्ये ‘पठाण’ प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे सिनेमाला किती पाठिंबा मिळतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
फॅन क्लबचे को-फाउंडर यश परयानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘SRK २०० पेक्षा अधिक शहरांमध्ये ‘पठाण’च्या FDFS चं आयोजन करणार आहे. यामध्ये ५० हजारांपेक्षा जास्त चाहते सामिल होण्याचा अंदाज देखील परयानी यांनी व्यक्त केला. यातून जवळपास १ कोटी रुपयांचा गल्ल जमा करु शकतो असं देखील परयानी म्हणाले आहेत.
मीडियारिपोर्ट्स नुसार, ‘पठाण’ सिनेमातील ‘बेशर्म रंग’ गाण्यावर होणारा विरोध पाहता सेंसर बोर्डाने सिनेमातील काही सिनवर कात्री चालवली असून सिनेमात महत्त्वाचे बदल केले आहेत. सिनेमा २५ जानेवारी रोजी मोठ्या पडद्यावर दाखल होणार आहे.
‘पठाण’ सिनेमातून शाहरुख तब्बल चार वर्षांनी पुन्हा पदार्पण करणार असल्यामुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सिनेमात दीपिका आणि शाहरुख सोबतच अभिनेता जॉन अब्राहम देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.