शाहरुख खान सिनेमा हिट होण्यासाठी काय खास करतो?; काय आहे किंग खानचं मोठं रहस्य?
बाॅलिवूड अभिनेता शाहरुख खान हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. विशेष म्हणजे शाहरुख खान याचे एका मागून एक चित्रपट रिलीज होत असून हे चित्रपट धमाका करताना दिसत आहेत. शाहरुख खान याने नुकताच एक अत्यंत मोठा असा खुलासा केलाय. ज्याची जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे.
मुंबई : बाॅलिवूड अभिनेता शाहरुख खान हा कायमच चर्चेत असतो. 2023 हे वर्षे शाहरुख खान याच्यासाठी अत्यंत खास आणि लक्की ठरलंय. शाहरुख खान याचे एका मागून एक चित्रपट रिलीज झाले. विशेष म्हणजे शाहरुख खान याच्या या चित्रपटांनी जोरदार धमाका केला. शाहरुख खान याच्या चित्रपटांबद्दल चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ ही बघायला मिळाली. शाहरुख खान याचा 2019 मध्ये झिरो हा चित्रपट रिलीज झाला. मात्र, झिरो हा चित्रपट फ्लाॅप गेला. झिरो चित्रपट फ्लाॅप गेल्यापासून शाहरुख खान हा मोठ्या पडद्यापासून दूर होता. शाहरुख खानचे चाहते त्याच्या पुनरागमनाची वाट पाहत होते.
शाहरुख खान याचे पठाण, जवान हे चित्रपट धमाका करताना दिसले. आता नुकताच शाहरुख खान याने मोठा खुलासा केलाय. शाहरुख खान याने थेट सांगितले की, चित्रपट हिट ठरण्यासाठी तो नेमके काय करतो. हेच नाही तर यामुळेच आपले चित्रपट हिट होत असल्याचे सांगताना शाहरुख खान दिसतोय. आता शाहरुख खान याच्या या विधानाची जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे.
शाहरुख खान म्हणाला की, भारतामध्ये शुक्रवारी चित्रपट रिलीज होतात. म्हणून मी गुरूवारी तब्बल अडीच तास अंघोळ करतो. त्याचे कारणही तेवढेच मोठे आणि महत्वाचे असल्याचे सांगताना शाहरुख खान हा दिसतोय. चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदर आपण त्या कॅरेक्टरला धुवून टाकत असल्याचे सांगताना शाहरुख खान हा दिसतोय. विशेष म्हणजे तो गेल्या काही दिवसांपासून हे फाॅलो करतोय.
आता शाहरुख खान याच्या या विधानाची जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे. शाहरुख खान याच्या पठाण चित्रपटाला जोरदार विरोध हा होताना दिसला. अनेकांनी तर या चित्रपटावर बंदी घालण्याची थेट मागणी केली. या चित्रपटाच्या विरोधात जोरदार आंदोलने देखील करण्यात आली. सतत पठाण चित्रपटाला विरोध हा वाढताना दिसला.
प्रत्यक्षात चित्रपट रिलीज झाल्यानंतर पठाण चित्रपटाने जोरदार धमाका केला. शाहरुख खान याने त्याच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या आहेत. शाहरुख खान याची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. शाहरुख खान हा सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय देखील दिसतो. चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदर तो चाहत्यांसाठी खास सेशनचे आयोजन देखील करतो.