Shah Rukh Khan ला मुलांकडून मोठी अपेक्षा; किंग खानने अखेर बोलून दाखवलंच
आयुष्यात अनेक चढ - उतार आल्यानंतर अभिनेता शाहरुख खान याला मुलांकडून 'ही' अपेक्षा... अनेक वर्षांनंतर अखेर अभिनेत्याने बोलून दाखवलंच... सर्वत्र अभिनेत्याची चर्चा

मुंबई : अभिनेता शाहरुख खान कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. करियरच्या सुरुवातील अनेक संघर्षांचा सामना केल्यानंतर अभिनेता शाहरुख खान याने त्याच्या मेहमतीच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान भक्कम केलं. शाहरुख अनेक नव्या कालाकारांच्या प्रेरणास्थानी आहे. आज अशी कोणतीच गोष्ट नाही जी किंग खानकडे नाही. प्रसिद्धी, संपत्ती यांच्या पलीकडे अभिनेत्यांच्या चाहत्यांची संख्या देखील प्रचंड मोठी आहे. शाहरुख कायम यशाच्या मार्गाने प्रवास करत असतो. असं असताना अभिनेत्याने एका मुलाखतीत मुलांकडून असणारी अपेक्षा व्यक्त केली आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमधून अभिनेत्याचं वक्तव्य समोर आलं आहे.
किंग खान म्हणाला, ‘त्यांचं आरोग्य सुदृढ राहायलं हवं. यापेक्षा देवाकडून आणखी काहीही नको. मी स्वतःच्यामध्ये अभ्यासाची शिक्षणाची आवड निर्माण करेल… खेळचं देखील जीवनात महत्त्व आहे. माझ्याकडून त्यांना जर काही शिकायचं असेल, तर माझी अपेक्षा आहे, त्यांनी माझ्याकडून सेन्स ऑफ ह्यूमर शिकावं आणि आयुष्यात कायम आनंदी राहावं…’ असं खुद्द अभिनेता शाहरुख खान एका मुलाखतीत म्हणाला.




आर्यन खान याच्याबद्दल सांगायचं झालं तर, आर्यन याने नुकताच स्वतःचा क्लोदिंग ब्रॉन्ड सुरु केला आहे. शिवाय आर्यन याला अभिनयात आवड नसून तो पडद्यामागे राहून काम करणार आहे. तर दुसरीकडे किंग खान याची मुलगी सुहाना खान हिला मात्र अभिनयाची आवड आहे. सुहाना लवकरच दिग्दर्शक झोया अख्तर दिग्दर्शित ‘द अर्चिज’ सिनेमातून अभिनय क्षेत्रात पाय ठेवणार आहे.
View this post on Instagram
शाहरुख खान याच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेता लवकरच ‘जवान’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. किंग खान याने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांच्या मनात राज्य केलं. पण अभिनेत्याच्या ‘झिरो’ सिनेमाला हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर अभिनेता चार वर्ष रुपेरी पडद्यापासून दूर होता…
चार वर्षांनंतर जेव्हा ‘पठाण’ सिनेमाच्या माध्यमातून किंग खान प्रेक्षकांच्या भेटीस आला. तेव्हा अभिनेत्याने पुन्हा चाहत्यांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली. सिनेमाने फक्त भारतातच नाही तर, साता समुद्रापार देखील मोठी कामगिरी केली. ‘जवान’ सिनेमाशिवाय किंग खान अभिनेता सलमान खान याच्या ‘टायगर ३’ सिनेमात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे.