Shah rukh khan | शाहरुख खान थेट म्हणाला, ‘या’ चित्रपटांमध्ये मला कोणीच काम दिले नाही, अखेर किंग खानने मनातील खदखद सांगितलीच
बाॅलिवूड अभिनेता शाहरुख खान हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या चित्रपटामुळे जोरदार चर्चेत आहे. शाहरुख खान याचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. विशेष म्हणजे शाहरुख खान याच्या जवान चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ आहे.
मुंबई : बाॅलिवूड अभिनेता शाहरुख खान (Shah rukh khan) याचा नुकताच जवान हा चित्रपट रिलीज झालाय. विशेष म्हणजे शाहरुख खान याचा हा चित्रपट मोठा धमाका करताना दिसतोय. जवान चित्रपटाने ओपनिंग डेलाच 75 कोटींचे बाॅक्स आॅफिस कलेक्शन हे केले. शाहरुख खान याच्या या चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. शाहरुख खान हा जवान (Jawan) चित्रपटाचे धमाकेदार पद्धतीने प्रमोशन करताना दिसला. शाहरुख खान याचा काही दिवसांपूर्वीच रिलीज झालेला पठाण हा चित्रपट त्याच्या करिअरमधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला.
शाहरुख खान हा काही दिवसांपूर्वीच जवान चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी दुबईच्या एका क्लबमध्ये पोहचला. या क्लबमधील अनेक व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले. शाहरुख खान हा यावेळी आपल्या चित्रपटातील गाण्यांवर धमाकेदार डान्स करताना देखील दिसला. शाहरुख खान याचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.
शाहरुख खान याने नुकताच एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमुळेच शाहरुख खान हा चर्चेत आलाय. या मुलाखतीमध्ये शाहरुख खान याने अनेक वर्षांनंतर आपल्या मनातील खदखद ही व्यक्त केलीये. शाहरुख खान याने मोठा खुलासा केला आहे. शाहरुख खान हा म्हणाला की, मला बऱ्याच वर्षांपासून अॅक्शन चित्रपटांमध्ये काम करण्याची इच्छा होती.
मुळात म्हणजे मला कोणीही अॅक्शन चित्रपटांसाठी आॅफर करत नव्हते. मी अॅक्शन चित्रपटांची वाट पाहत होतो. मी माझ्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक रोमांटिक चित्रपट केले आहेत. मात्र, अॅक्शन नाही. माझे स्वप्न होते अॅक्शन चित्रपटांमध्ये काम करण्याचे. मात्र, मला कोणीही साईनच करत नव्हते. जवान चित्रपटामध्ये अॅक्शन सीन्स करताना किंग खान दिसतोय.
पुढे शाहरुख खान हा म्हणाला की, होय मला हे माहिती आहे की, यासाठी थोडा उशीर झालाय. मात्र, मला अॅक्शन चित्रपट करून भारी वाटत आहे आणि मी खुश आहे. शाहरुख खान याच्या जवान चित्रपटाची मोठी हवा बाॅक्स आॅफिसवर बघायला मिळत आहे. शाहरुख खान याचा जवान हा चित्रपट नेमके कोणते रेकाॅर्ड तोडतो हे पाहण्यासारखे ठरणार आहे.
शाहरुख खान याचा आता जवान चित्रपटानंतर लगेचच डंकी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचे शूटिंग करताना शाहरुख खान हा कश्मीर येथे दिसला. जवान चित्रपटामध्ये शाहरुख खान याची भरपूर अॅक्शन बघायला मिळत असल्याने चाहत्यांमध्ये आनंद आहे.