शाहरुख खान याला काय झालंय? क्लिनिक बाहेर चेहरा लपवताना दिसला अभिनेता, व्हिडीओ व्हायरल

Shah Rukh Khan : शाहरुख खान क्लिनिक बाहेर स्पॉट... पण किंग खान याने का लपवला स्वतःचा चेहरा, अभिनेत्याला झालंय तरी काय? सोशल मीडियावर शाहरुख खान याचा एक व्हिडीओ होत आहे तुफान व्हायरल... सर्वत्र किंग खान याचीच चर्चा...

शाहरुख खान याला काय झालंय? क्लिनिक बाहेर चेहरा लपवताना दिसला अभिनेता,  व्हिडीओ व्हायरल
Follow us
| Updated on: Jan 18, 2024 | 10:39 AM

मुंबई | 18 जानेवारी 2024 : अभिनेता शाहरुख खान सध्या ज्याठिकाणी स्पॉट केलं जातं, अभिनेता त्याठिकाणी हुडी घावून आणि छत्रीने स्वतःचा चेहरा लपवताना दिसतो. सांगायचं झालं तर, चाहते आणि पापाराझींपासून स्वतःचा वाचवण्यासाठी शाहरुख खान सतत प्रयत्न करत असतो. पण एखाद्या कार्यक्रमात शाहरुख त्याच्या स्वागने एन्ट्री करतो आणि चर्चेत राहतो. तेव्हा शाहरुख स्वतःचा चेहरा लपवण्याचा प्रयत्न करत नाही. शाहरुख खान असं का करत आहे? असं चाहते कायम विचारत असतात. आता देखील शाहरुख याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये अभिनेता स्वतःचा चेहरा लपवताना दिसत आहे.

शाहरुख खान याला बुधवारी मुंबईतील एका क्लिनिक बाहेर स्पॉट करण्यात आलं. क्लिनिकमधून परतत असताना, पापाराझी आणि चाहत्यांनी अभिनेत्याला घेरलं.. प्रत्येक जण शाहरुख खान याची एक झलक पाहाण्यासाठी उत्सुक आणि प्रयत्न करत होता. मात्र अभिनेत्यासह सुरक्षा रक्षकांनी शाहरुखची एकही झलक दिसू नये यासाठी सर्व प्रयत्न केले. शाहरुखने आपला चेहरा हुडीने झाकलेला होता. याशिवाय एका सुरक्षा रक्षकाने अभिनेत्याला छत्रीने लपवलं होतं.

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Voompla (@voompla)

शाहरुख खान याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओवर कमेटं करत चाहते प्रतिक्रिया देत आहेत. एथ युजर म्हणाला, ‘शाहरुख खान अशा प्रकारे स्वतःचा चेहरा का लपवत आहे…’, दुसरा चाहता म्हणाला, ‘शाहरुख खान याने चाहत्यांसोबत फोटो का काढले नाहीत?’ सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त शाहरुख खान याची चर्चा रंगत आहे. शिवाय शाहरुख याला क्लिनिकबाहेर स्पॉट करण्यात आल्यामुळे अनेक चाहत्यांनी चिंता देखील व्यक्त केली आहे…

शाहरुख खान याचे आगामी सिनेमे

2023 मध्ये शाहरुख खान याचे तीन सिनेमे मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाले. अभिनेत्याच्या तिन्ही सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर तुफान कामगिरी केली. ‘पठाण’, ‘जवान’ आणि ‘डंकी’ सिनेमात शाहरुख खान याने मुख्य भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं. चार वर्षांनंतर बॉलिवूडमध्ये पुन्हा पदार्पण केल्यामुळे शाहरुख खान याची तुफान चर्चा रंगली.

आता शाहरुख आणि सलमान खान एकत्र स्क्रिन शेअर करणार असल्याची चर्चा रंगत आहे. ‘टायगल व्हर्सेस पठाण’ सिनेमाची शुटिंग सुरु होणार असल्याची देखील चर्चा रंगत आहे. तर दुसरीकडे शाहरुख खान दिग्दर्शत संजय लिला भंसाळी यांच्या ‘इंशाल्लाह’ सिनेमात झळकणार असल्याची देखील चर्चा रंगत आहे. सिनेमाची शुटिंग 2024 मध्ये सुरु होणार असल्याची माहिती मिळत आहे.

छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.