अदानी, अंबानी या श्रीमंतांच्या यादीत शाहरुख खान, किती झाली किंग खानची संपत्ती?

Shah Rukh Khan Networth: एका वर्षात इतक्या करोडो रुपयांनी वाढली शाहरुख खान याची संपत्ती, अब्जवधी उद्योजक अदानी आणि अंबानी यांसारख्या श्रीमंत व्यक्तींच्या यादीत किंग खानचं नाव, सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त शाहरुख खान याच्या संपत्तीची चर्चा

अदानी, अंबानी या श्रीमंतांच्या यादीत शाहरुख खान, किती झाली किंग खानची संपत्ती?
Follow us
| Updated on: Aug 30, 2024 | 8:09 AM

बॉलिवूडचा किंग खान म्हणजे अभिनेता शाहरुख खान याने पहिल्यांदा हुरुन इंडियाच्या श्रीमंतांच्या यादीत स्वतःच्या नाव नोंदवलं आहे. वयाच्या 58 व्या वर्षी शाहरुख खान याच्याकडे 7,300 कोटी रुपयांची संपत्ती असल्याची माहिती मिळत आहे. गेल्या एका वर्षांत शाहरुख खान याच्या संपत्तीमध्ये मोठी वाढ झाली आहे. कोलकाता नाईट रायडर्स आणि रेड चिलीज एन्टरटेनमेंटमुळे शाहरुख खान श्रीमंतांच्या यादीत विराजमान झाला आहे. सांगायचं झालं तर, श्रीमंतांच्या यादीत पहिल्या स्थानी गौतम अदानी तर, दुसऱ्या स्थानी मुकेश अंबानी आहेत.

रिपोर्टनुसार, रुपेरी पडद्यावर सिनेमांमुळे किंग खान याने रचलेला इतिहास आणि कोलकाता नाईट रायडर्सला मिळालेल्या विजयानंतर शाहरुख खान याच्या संपत्तीमध्ये वाढ झाली आहे. शिवाय सोशल मीडियावर देखील शाहरुख याच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. इतर श्रीमंत व्यक्तींच्या तुलनेत शाहरुख याच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. ट्विटरवर शाहरुख खान याला 44.1 नेटकरी फॉलो करतात.

सांगायचं झालं, या यादीमध्ये इतर सेलिब्रिटींची देखील नावं आहे. शाहरुख खान याच्यानंतर श्रीमंत दुसरं तिसरं कोणी नाही तर, अभिनेत्री जुही चावला आहे. जुही चावला हिच्याकडे 4,600 कोटी रुपयांची संपत्ती आहे. शाहरुख खान आणि जुही चावला पार्टनर देखील आहे. जुही क्रिकेट टीम कोलकाता नाईट रायडर्सची को-ओनर आहे.

जुही चावला हिच्यानंतर अभिनेता हृतिक रोशन याचं श्रीमंतांच्या यादीत नाव आहे. अभिनेत्याकडे 2000 कोटी रुपयांची संपत्ती आहे. महानायक अमिताभ बच्चन आणि त्यांचं कुटुंब देखील यादीत चौथ्या स्थानी आहेत. बच्चन कुटुंबाकडे 1,600 कोटी रुपयांची संपत्ती आहे. तर बॉलिवूडचा प्रसिद्ध आणि लोकप्रिय दिग्दर्शक करण जोहर देखील पाचव्या स्थानी आहे. करण याच्याकडे 1400 कोटी रुपयांची संपत्ती आहे.

अभिनेता शाहरुख खान याच्याबद्दल सांगायचं झालं तर, ‘पठाण’, ‘जवान’, ‘डंकी’ सिनेमामुळे अभिनेत्याने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली. किंग खानच्या सिनेमांना फक्त भारतीय चाहत्यांनी नाही तर, परदेशातील चाहत्यांनी देखील डोक्यावर घेतलं. तब्बल चार वर्षांनंतर ‘पठाण’ सिनेमाच्या माध्यमातून शाहरुख खान याने पुन्हा बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. म्हणून अभिनेत्याची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी चित्रपटगृहात गर्दी केली होती. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त शाहरुख खान याच्या संपत्तीची चर्चा रंगली आहे.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.