Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jawan Starcast Fees | शाहरुख खान ते नयनतारा.. ‘जवान’साठी कोणाला किती मिळालं मानधन?

या व्हिडीओतील शाहरुखचे विविध लूक, धमाकेदार ॲक्शन सीन्स आणि दमदार कलाकारांची फौज यांमुळे 'जवान'च्या कथेविषयी औत्सुक्य निर्माण झालं आहे. प्रीव्ह्यू व्हिडीओ पाहून हे सहज लक्षात येतं की शाहरुखचा हा चित्रपटसुद्धा बिग बजेट आहे.

Jawan Starcast Fees | शाहरुख खान ते नयनतारा.. 'जवान'साठी कोणाला किती मिळालं मानधन?
जवान चित्रपटImage Credit source: Youtube
Follow us
| Updated on: Jul 12, 2023 | 10:17 AM

मुंबई : बॉलिवूडचा ‘किंग’ अर्थात अभिनेता शाहरुख खानच्या आगामी ‘जवान’ या चित्रपटाविषयी चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. नुकताच या चित्रपटाचा जवळपास दोन मिनिटांचा प्रीव्ह्यू व्हिडीओ प्रदर्शित झाला. या व्हिडीओला नेटकऱ्यांकडून दमदार प्रतिसाद मिळत आहे. ‘पठाण’ या चित्रपटाच्या यशानंतर चाहत्यांना शाहरुखच्या आगामी प्रोजेक्ट्सविषयी उत्सुकता होती. ती उत्सुकता आता ‘जवान’चा प्रीव्ह्यू पाहिल्यानंतर दुप्पट वाढली आहे. या व्हिडीओतील शाहरुखचे विविध लूक, धमाकेदार ॲक्शन सीन्स आणि दमदार कलाकारांची फौज यांमुळे ‘जवान’च्या कथेविषयी औत्सुक्य निर्माण झालं आहे. प्रीव्ह्यू व्हिडीओ पाहून हे सहज लक्षात येतं की शाहरुखचा हा चित्रपटसुद्धा बिग बजेट आहे. बॉलिवूडपासून ते दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील मोठे कलाकार यामध्ये झळकणार आहेत. या कलाकारांनी चित्रपटासाठी किती मानधन घेतलं ते जाणून घेऊयात..

जवळपास 220 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या ‘जवान’ या चित्रपटात शाहरुख खान मुख्य भूमिकेत आहे. ‘पठाण’च्या यशानंतर शाहरुखने त्याची फी वाढवल्याचं कळतंय. म्हणूनच त्याने ‘जवान’साठी तब्बल 100 कोटी रुपये मानधन स्वीकारलं आहे. इतकंच नव्हे तर बॉक्स ऑफिसवर मिळणारा प्रतिसाद पाहून कमाईच्या 60 टक्के नफासुद्धा शाहरुख घेणार असल्याचं कळतंय.

नयनतारा- या चित्रपटातून प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा बॉलिवूडमध्ये पदार्पण करतेय. चित्रपटात तिचा जबरदस्त ॲक्शन अवतार पहायला मिळणार असून भूमिकेसाठी तिने जवळपास 8 ते 11 कोटी रुपये मानधन स्वीकारल्याचं समजतंय.

हे सुद्धा वाचा

विजय सेतुपती- दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील आणखी एक लोकप्रिय नाव म्हणजे विजय सेतुपती. विजयने सुरुवातीला या चित्रपटासाठी 15 कोटी रुपये फी मागितली होती. मात्र ‘विक्रम’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान हिट झाल्यानंतर त्याने आपली फी वाढवली. ‘जवान’मधील भूमिकेसाठी त्याने 21 कोटी रुपये मानधन घेतल्याचं कळतंय. विजयच्या करिअरमधील हे सर्वाधिक मानधन असल्याचं म्हटलं जात आहे.

सान्या मल्होत्रा- ‘दंगल गर्ल’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री सान्या मल्होत्राने या चित्रपटातील भूमिकेसाठी दोन कोटी रुपये स्वीकारले आहेत.

प्रियामणी- ‘द फॅमिली मॅन’ या वेब सीरिजमधून घराघरात पोहोचलेली दाक्षिणात्य अभिनेत्री प्रियामणीसुद्धा ‘जवान’मध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे. या भूमिकेसाठी तिने एक कोटी रुपये मानधन घेतलं आहे.

दाक्षिणात्य चित्रपट दिग्दर्शक अटलीने ‘जवान’चं दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटात ग्रॅमी पुरस्कार नामांकित आणि लोकप्रिय कलाकार राजा कुमारी यांचा ‘द किंग खान रॅप’सुद्धा समाविष्ट आहे. जवान या चित्रपटाची निर्मिती शाहरुखची पत्नी गौरी खान आणि रेड चिलीज एंटरटेन्मेंटने केली आहे. येत्या 7 सप्टेंबर रोजी हा बहुप्रतिक्षित चित्रपट जगभरात प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

अन् एकनाथ शिंदेंनी 'त्या' मजूर कुटुंबाची जबाबदारी उचलली
अन् एकनाथ शिंदेंनी 'त्या' मजूर कुटुंबाची जबाबदारी उचलली.
भर उन्हात बरसल्या अवकाळी पावसाच्या सरी
भर उन्हात बरसल्या अवकाळी पावसाच्या सरी.
मग तुम्ही हजामत करत होते का? जयंत पाटलांनी सरकारला धरलं धारेवर
मग तुम्ही हजामत करत होते का? जयंत पाटलांनी सरकारला धरलं धारेवर.
आदित्य ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना बघणं टाळलं
आदित्य ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना बघणं टाळलं.
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच...
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच....
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?.
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका.
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार.
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है.
अमीर खानने घेतली धनंजय देशमुखांची भेट
अमीर खानने घेतली धनंजय देशमुखांची भेट.