मुंबई : बाॅलिवूड अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या चित्रपटामुळे जोरदार चर्चेत आहे. विशेष म्हणजे एका मागून एक असे चित्रपट शाहरुख खान याचे चाहत्यांच्या भेटीला येणार आहेत. शाहरुख खान याचा काही दिवसांपूर्वीच पठाण हा चित्रपट रिलीज झाला. विशेष म्हणजे शाहरुख खान याचा हा चित्रपट (Movie) धमाका करताना दिसला आणि त्याच्या करिअरमधीस सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट देखील ठरला.
शाहरुख खान हा सध्या सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय दिसत आहे. आपल्या आगामी चित्रपटाचे प्रमोशन करत आहे. आता शाहरुख खान याचा आगामी जवान हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. जवान या चित्रपटानंतर लगेचच डंकी हा चित्रपट रिलीज होईल. काही दिवसांपूर्वीच शाहरुख खान याने आपल्या चाहत्यांसाठी खास सेशनचे आयोजन केले होते.
या सेशनमध्ये शाहरुख खान हा आपल्या चाहत्यांच्या प्रश्नाला उत्तरे देताना दिसला. नुकताच शाहरुख खान याने गाैरी खान हिची एक पोस्ट रिशेअर केली आहे. या पोस्टमध्ये शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये शाहरुख खान याची लेक सुहाना खान ही दिसत आहे. सुहाना खान ही एका पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यामध्ये पोहचली होती. याचा तो व्हिडीओ आहे.
Yeah the circle of life is closing in for us with our babies helping us complete it. You’ve done so well with the three of them…educated them, taught them dignity & desire to share love…& Suhana is so articulate but the dimple is mine!! https://t.co/uazVfG2e6Z
— Shah Rukh Khan (@iamsrk) August 16, 2023
गाैरी खान हिची पोस्ट रिशेअर करत शाहरुख खान याने लिहिले की, गाैरी खान हिने आपल्या तीनही मुलांचे खूप चांगल्या प्रकारे संगोपन हे केले आहे. त्यांना शिकवले आहे. तिने त्यांना खूप चांगले संस्कार दिले आहे. शाहरुख खानने पुढे लिहिले की, सुहाना खूप जास्त स्पष्टवादी आहे परंतू डिंपलवर माझ्यावर गेली आहे.
आता शाहरुख खान याची हिच पोस्ट सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. चाहते या पोस्टवर मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत. आता सुहाना खान ही लवकरच बाॅलिवूड चित्रपटांमध्ये धमाका करताना दिसणार आहे. शाहरुख खानची लेक सुहाना खान, अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त नंदा आणि बोनी कपूर यांची लेक खुशी कपूर हे एकाच चित्रपटामधून बाॅलिवूडमध्ये पदार्पण करणार आहेत.