मुंबई : बाॅलिवूड अभिनेता शाहरुख खान हा नेहमीच चर्चेत असतो. शाहरुख खान (Shah Rukh Khan) याचा काही दिवसांपूर्वीच पठाण हा चित्रपट रिलीज झाला. शाहरुख खान याच्या या चित्रपटाने धमाकेदार कमाई देखील केली. विशेष म्हणजे शाहरुख खान याने या चित्रपटातून तब्बल चार वर्षांनंतर बाॅलिवूडमध्ये (Bollywood) पुनरागमन केले. शाहरुख खान याचा 2019 मध्ये झिरो हा चित्रपट रिलीज झाला. मात्र, या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली आणि हा चित्रपट फ्लाॅप गेला. तेंव्हापासूचन शाहरुख खान हा मोठ्या पडद्यापासून दूर होता. शाहरुख खान याचे चाहते सतत त्याच्या आगामी चित्रपटांची (Movie) वाट पाहताना दिसत होते. शेवटी पठाण चित्रपटातून त्याने पुनरागमन केले.
शाहरुख खान हा फार काही पठाण चित्रपटाचे प्रमोशन करताना देखील दिसला नाही. फक्त शाहरुख खान हा चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदर सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात होता. इतकेच नाही तर तो सेशनच्या माध्यमातून सतत आपल्या चाहत्यांच्या प्रश्नाला उत्तरे देताना देखील दिसला. तो आपल्या चाहत्यांसोबत प्रत्येक अपडेट शेअर करत होता.
नुकताच शाहरुख खान याने चाहत्यांना मोठा धक्का देत आज सोमवारी थेट आस्क एसआरके सेशन घेतले. या सेशनमध्ये शाहरुख खान हा चाहत्यांच्या प्रश्नाला उत्तरे देताना दिसला. शाहरुख खान याला एका चाहत्याने थेट विचारले की, सिगारेट सोडून दिले का तू? यावर शाहरुख खान याने उत्तर देताना अत्यंत मोठा खुलासा हा केला आहे.
शाहरुख खान म्हणाला की, हो मी खोटे बोललो…मला स्वतःला कॅन्सरच्या स्टिकच्या धुराने वेढले आहे. शाहरुख खान याचे हे उत्तर ऐकून चाहते हैराण झाल्याचे बघायला मिळाले. यावर एकाने कमेंट करत म्हटले की, शाहरुख खान तुला काहीच होणार नाहीये. सर्व लोक तुझ्यावर खूप जास्त प्रेम करतात. मात्र, शाहरुख खान याने अशाप्रकारचे उत्तर नेमके का दिले यावर चर्चा रंगताना दिसत आहे.
मुळात म्हणजे 2011 ला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये शाहरुख खान याने धक्कादायक खुलासा केला होता. शाहरुख खान म्हणाला होती की, त्याला सिगारेट ओढल्याशिवाय काही सुचत नाही. इतकेच नाही तर दिवसाला त्याला तब्बल 30 सिगारेट लागतात. सिगारेटच्या नादामध्ये त्याला जेवण करायचे आणि पाणी प्यायचे देखील लक्षात राहत नाही. मात्र, काही दिवसांपूर्वीच्या रिपोर्टनुसार त्याने सिगारेट सोडली आहे.