Shah Rukh Khan | पत्नीबद्दल हे काय बोलून गेला शाहरुख खान, थेट म्हणाला, मी माझीच सांभाळू शकत नाही आणि तुझी काय
बाॅलिवूड अभिनेता शाहरुख खान हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या आगामी चित्रपटांमुळे जोरदार चर्चेत आहे. शाहरुख खान याचा काही दिवसांपूर्वीच रिलीज झालेला पठाण हा चित्रपट धमाका करताना या चित्रपटाने अनेक रेकाॅर्ड हे आपल्या नावे केली आणि शाहरुख खान याच्या करिअरमधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला.

मुंबई : बाॅलिवूड अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या चित्रपटामुळे जोरदार चर्चेत आहे. विशेष म्हणजे शाहरुख खान याच्यासाठी हे वर्षे अत्यंत खास आहे. कारण यंदा शाहरुख खान याने तब्बल चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन हे केले आहे. शाहरुख खान याचा काही दिवसांपूर्वीच रिलीज झालेला पठाण हा चित्रपट (Movie) हिट ठरला आणि या चित्रपटाने बाॅक्स आॅफिसवर मोठा धमाका केला. शाहरुख खान याच्या पठाण चित्रपटाने अनेक रेकाॅर्ड हे आपल्या नावावर केले आहेत.
विशेष म्हणजे शाहरुख खान याचा पठाण हा चित्रपट शाहरुख खान याच्या करिअरमधील सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट आहे. शाहरुख खान याचा 2019 मध्ये झिरो हा चित्रपट रिलीज झाला होता. मात्र, शाहरुख खान याचा हा चित्रपट फ्लाॅप गेला आणि तेंव्हापासून शाहरुख खान हा मोठ्या पडद्यापासून दूर होता. चाहते त्याच्या पुनरागमनाची वाट पाहत होते.
शेवटी पठाण हा चित्रपट धमाका करताना दिसला. आता शाहरुख खान याचा जवान हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या चित्रपटाचे सोशल मीडियावर धमाकेदार प्रमोशन करताना शाहरुख खान हा दिसत आहे. आता शाहरुख खान याच्या जवान चित्रपटाची चाहते हे आतुरतेने वाट पाहताना दिसत आहेत.
Ok guys no more wife problem solving questions anymore!! Please!! Mujhse meri nahi sambhalti tum apni problems bhi mujh par daal rahe ho!!!! All wives please just go for #Jawan without stress https://t.co/SMQzeP89yS
— Shah Rukh Khan (@iamsrk) August 26, 2023
नुकताच शाहरुख खान याने आपल्या चाहत्यांसाठी एका खास सेशनचे आयोजन हे सोशल मीडियावर केले. यावेळी चाहत्यांच्या प्रश्नाला उत्तरे देताना शाहरुख खान हा दिसला आहे. शाहरुख खान याला एका चाहत्याने म्हटले की, माझी पत्नी ही नेहमीच उशीर करते. पठाण चित्रपट बघण्यासाठी गेलो त्यावेळीही तिने उशीर केला होता.
जवान चित्रपटाला वेळेवर पोहचण्यासाठी मला काही खास टिप्स द्या. यावर शाहरुख खान याने मजेदार उत्तर देत म्हटले की, प्लीज मला पत्नींबद्दल प्रश्न विचारू नका. मला माझीच सांभाळली जात नाही आणि मी तुम्हाला काय सांगू. पुढे शाहरुख खान म्हणाला की, सर्व पत्नींनी प्लीज जवान चित्रपट बघण्यासाठी वेळेवर या.