Shah Rukh Khan | शूटिंगदरम्यान शाहरुख खानला दुखापत; नाकातून रक्तस्राव झाल्याने करावी लागली सर्जरी

बॉलिवूड इंडस्ट्रीतील 31 वर्षांच्या करिअरमध्ये शाहरुखला याआधीही अनेकदा दुखापतींचा सामना करावा लागला होता. 2017 मध्ये त्याच्यावर सर्जरी करण्यात आली होती. 'रईस' या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली होती.

Shah Rukh Khan | शूटिंगदरम्यान शाहरुख खानला दुखापत; नाकातून रक्तस्राव झाल्याने करावी लागली सर्जरी
शाहरुख खान
Follow us
| Updated on: Jul 04, 2023 | 1:44 PM

मुंबई : अभिनेता शाहरुख खानला त्याच्या आगामी प्रोजेक्टसाठी शूटिंग करत असताना दुखापत झाल्याची माहिती समोर येत आहे. लॉस एंजिलिसमध्ये त्याचं शूटिंग सुरू होतं. सेटवरील अपघातानंतर अमेरिकेतच शाहरुखवर सर्जरी करण्यात आली. या सर्जरीनंतर शाहरुखच्या नाकावर बँडेज पहायला मिळालं. सध्या तो भारतात परतला असून घरीच विश्रांती घेत असल्याचं कळतंय. मात्र या अपघाताबद्दल अद्याप शाहरुख किंवा त्याच्या टीमकडून कोणतीच अधिकृत माहिती देण्यात आली नाही. ‘शाहरुख खान लॉस एंजिलिसमध्ये एका प्रोजेक्टसाठी शूटिंग करत होता. त्यावेळी त्याच्या नाकाला दुखापत झाली आणि रक्त वाहू लागलं. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केलं असता नाकावर सर्जरी करण्यात आली’, असं वृत्त ई टाइम्सने दिलं आहे.

‘रक्तस्राव थांबवण्यासाठी छोटी सर्जरी करावी लागेल आणि काळजी करण्याचं कोणतंच कारण नाही, अशी माहिती डॉक्टरांकडून शाहरुखच्या टीमला देण्यात आली होती. सर्जरीनंतर शाहरुखच्या नाकावर पट्टी पहायला मिळाली. तो सध्या भारतात परतला असून घरीच आराम करत आहे’, असंही या वृत्तात पुढे म्हटलं गेलं आहे.

बॉलिवूड इंडस्ट्रीतील 31 वर्षांच्या करिअरमध्ये शाहरुखला याआधीही अनेकदा दुखापतींचा सामना करावा लागला होता. 2017 मध्ये त्याच्यावर सर्जरी करण्यात आली होती. ‘रईस’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. त्यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया पार पाडावी लागली. 2013 मध्येही ‘चेन्नई एक्स्प्रेस’च्या शूटिंगनंतर शाहरुखवर आठवी सर्जरी करण्यात आली होती. त्याआधी 2009 मध्येही त्याच्या खांद्याला दुखापत झाली होती.

हे सुद्धा वाचा

शाहरुखने नुकतेच इंडस्ट्रीत 31 वर्षे पूर्ण केली आहेत. यानिमित्त त्याने ट्विटरवर ‘आस्क मी एनिथिंग’ या सेशनद्वारे चाहत्यांशी संवाद साधला होता. जवळपास चार वर्षांच्या ब्रेकनंतर त्याने ‘पठाण’ या चित्रपटातून कमबॅक केलं. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली. त्याचा ‘जवान’ हा चित्रपट येत्या 7 सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जवान या चित्रपटात शाहरुखसोबतच नयनतारा आणि विजय सेतुपती यांच्याही मुख्य भूमिका आहेत. याशिवाय ‘डंकी’ हा चित्रपटसुद्धा प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत आहे. यामध्ये तो तापसी पन्नूसोबत भूमिका साकारणार आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.