Pathaan 2 | पठाणचा सीक्वेल येणार? पत्रकार परिषदेत शाहरुख खानने दिली मोठी हिंट

25 जानेवारी रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्याच्या पाच दिवसांनंतर पठाणची टीम माध्यमांसमोर आली. यावेळी शाहरुख पठाण या चित्रपटाविषयी, त्याच्या चार वर्षांच्या ब्रेकविषयी आणि इतरही बऱ्याच मुद्द्यांविषयी मोकळेपणे व्यक्त झाला.

Pathaan 2 | पठाणचा सीक्वेल येणार? पत्रकार परिषदेत शाहरुख खानने दिली मोठी हिंट
Shah Rukh KhanImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jan 31, 2023 | 1:00 PM

मुंबई: अभिनेता शाहरुख खानने तब्बल चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर कमबॅक केलं आहे. त्याच्या चाहत्यांसाठी हा जणू उत्सवच आहे. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित ‘पठाण’ या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर तुफान प्रतिसाद मिळतोय. 25 जानेवारी रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्याच्या पाच दिवसांनंतर पठाणची टीम माध्यमांसमोर आली. यावेळी शाहरुख पठाण या चित्रपटाविषयी, त्याच्या चार वर्षांच्या ब्रेकविषयी आणि इतरही बऱ्याच मुद्द्यांविषयी मोकळेपणे व्यक्त झाला. ‘पठाण’ला मिळणारा प्रतिसाद पाहता त्याच्या सीक्वेलविषयी प्रश्न निर्माण होणं साहजिक आहे. या मुलाखतीत शाहरुखला पठाण 2 विषयी प्रश्न विचारण्यात आला.

या मुलाखतीत शाहरुखला ‘पठाण 2’विषयी त्याचं मत विचारलं गेलं. त्यावर बोलताना किंग खान म्हणाला, “पठाणमध्ये काम करणं ही माझ्यासाठी खूप मोठी संधी होती. या चित्रपटाला मिळणाऱ्या प्रेमामुळे आणि यशामुळे आज माझं कुटुंब, मित्रपरिवार खुश आहे. हे सर्व मला खूप काळानंतर मिळालं आहे. त्यामुळे या संधीबद्दल मी खूप आभारी आहे आणि इन्शा अल्लाह सिद्धार्थ आनंदला जर पठाण 2 करायचा असेल तर मी त्यात काम करण्यास इच्छुक आहे.”

याविषयी तो पुढे मस्करीत म्हणाला, “पठाण 2 साठी मी माझे केस कमरेपर्यंत वाढवायलाही तयार आहे. सीक्वेलसाठी माझ्याकडून जेवढी मेहनत होईल तेवढी मी करण्यास तयार आहे.” सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित या चित्रपटात शाहरुख खानसोबतच दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम यांच्याही मुख्य भूमिका आहेत.

हे सुद्धा वाचा

शाहरुख खानने तब्बल चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर कमबॅक केलं आहे. 2018 मध्ये त्याचा झिरो हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. मात्र बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट फ्लॉप ठरला होता. त्यानंतर शाहरुखने खूप मोठा ब्रेक घेतला.

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.