Pathaan | पाकिस्तानात पोहोचला पठाण; लपूनछपून दाखवला जातोय शाहरुख खानचा चित्रपट

शाहरुखचा 'पठाण' हा चित्रपट पाकिस्तान सोडून भारतासह इतर अनेक देशांमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने 6 दिवसांत कमाईचा 600 कोटींचा आकडा पार केला आहे. जगभरात सध्या याच चित्रपटाची जोरदार चर्चा आहे.

Pathaan | पाकिस्तानात पोहोचला पठाण; लपूनछपून दाखवला जातोय शाहरुख खानचा चित्रपट
Image Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Feb 01, 2023 | 6:01 PM

कराची: शाहरुख खानच्या ‘पठाण’चा देशभरात बोलबाला तर आहेच. पण आता या चित्रपटाची क्रेझ पाकिस्तानातही पोहोचली आहे. हा चित्रपट पाकिस्तानमध्ये अधिकृतरित्या प्रदर्शित झाला नाही. मात्र कराची शहरात या चित्रपटाची स्क्रीनिंग आयोजित करण्यात आली होती, तेसुद्धा सरकारी परिसरात. शाहरुखचा ‘पठाण’ हा चित्रपट पाकिस्तान सोडून भारतासह इतर अनेक देशांमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने 6 दिवसांत कमाईचा 600 कोटींचा आकडा पार केला आहे. जगभरात सध्या याच चित्रपटाची जोरदार चर्चा आहे.

पठाणची ही क्रेझ पाहूनच पाकिस्तानमधल्या प्रेक्षकांनाही चित्रपट पाहण्याचा मोह आवरला नसावा. त्याठिकाणी अधिकृतरित्या पठाण प्रदर्शित झाला नाही. त्यामुळे हा चित्रपट पाहण्यासाठी त्यांनी वेगळा मार्ग शोधून काढला.

‘डॉन’ने दिलेल्या वृत्तानुसार, फेसबुकवर एक जाहिरात पोस्ट करण्यात आली होती. कराचीमध्ये पठाणची स्क्रीनिंग आयोजित करण्यात आली आहे, असं त्या पोस्टमध्ये लिहिण्यात आलं होतं. या जाहिरातीत पठाणच्या एका तिकिटाची किंमत 900 रुपये दाखवण्यात आली. ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी चित्रपट पाहण्यात रस दाखवला.

हे सुद्धा वाचा

या पोस्टच्या कमेंटमध्ये काही जणांनी स्थळ आणि चित्रपटाच्या क्वालिटीविषयी प्रश्न विचारले. तर काहींनी पाकिस्तानमध्ये स्क्रिनिंगबद्दल प्रश्न उपस्थित केले. या प्रश्नांची उत्तरंही त्वरित देण्यात आली. रिप्लायमध्ये लिहिण्यात आलं की हा चित्रपट डिफेन्स हाऊसिंग अथॉरिटीमध्ये दाखवला जाईल. तसंच हा चित्रपट एचडी तर नाही मात्र स्पष्ट क्वालिटी नक्कीच असेल असं उत्तर देण्यात आलं.

पाकिस्तानात चित्रपट प्रदर्शित झाला नसताना ही स्क्रिनिंग कशी आयोजित केली असा प्रश्न विचारणाऱ्याला एक संपर्क क्रमांक देण्यात आला आणि कॉल करून त्यावरून माहिती घेण्यास सांगितलं. ज्या कंपनीने ही स्क्रिनिंग आयोजित केली त्या कंपनीचं नाव फायरवर्क इव्हेंट्स असं आहे. या कंपनीबद्दल माहिती तपासली असता ती एक युकेतील कंपनी असल्याचं समजतंय.

जाहिरातीच्या या पेजवरून थोड्या वेळात आणखी एक पोस्ट शेअर करण्यात आली आणि सांगण्यात आलं की शोची सर्व तिकिटं विकली गेली आहेत. त्यावर पाकिस्तानमधल्या शाहरुखच्या चाहत्यांनी आणखी दोन शोज आयोजित करण्याची विनंती केली. त्यापैकी एक शो रविवारी संध्याकाळी 4.30 वाजता आणि दुसरा शो रात्री 8 वाजता आहे.

फेब्रुवारी 2019 मध्ये फिल्म एग्जीबिटर्स कम्युनिटीने कोणताही भारतीय चित्रपट पाकिस्तानात प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार गेल्या चार वर्षांत भारताचा कोणताच चित्रपट तिथे प्रदर्शित झाला नाही.

कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....