वाढदिवशीच शाहरूख खानचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल, असं काय आहे ‘त्या’ व्हिडीओत?

अभिनेता शाहरुख खानचा आज 58 वा वाढदिवस आहे. या वाढदिवशी सोशल मीडियावर किंग खानचा एक खूप जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये शाहरुख सूत्रसंचालन करताना दिसतोय. शाहरुखच्या या व्हिडीओवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय.

वाढदिवशीच शाहरूख खानचा 'तो' व्हिडीओ व्हायरल, असं काय आहे 'त्या' व्हिडीओत?
शाहरुख खानImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Nov 02, 2023 | 9:39 AM

मुंबई : 2 नोव्हेंबर 2023 | बॉलिवूडचा किंग अर्थात अभिनेता शाहरुख खानचा आज 58 वा वाढदिवस आहे. अभिनय क्षेत्रात पदार्पण केल्यापासून शाहरुखने त्याचा दबदबा निर्माण केला आहे. इंडस्ट्रीत पाऊल ठेवण्याआधी त्याने बराच संघर्ष केला. आज वाढदिवसानिमित्त त्याचा अत्यंत जुना आणि दुर्मिळ व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये शाहरुख एका कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करताना दिसत आहे. यावेळी तो मंचावर गायक कुमार सानू यांना बोलावतो. या व्हिडीओमध्ये त्याने कुमार सानू यांची तुलना किशोर कुमार यांच्याशी केली आहे. त्याचा लूक, बोलण्याची पद्धत पाहून आणि आवाज ऐकून चाहते विविध प्रतिक्रिया देत आहेत. किंग खानचा हा जुना व्हिडीओ क्वचितच कोणी पाहिला असेल.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये शाहरुखसोबत आणखी एक निवेदिका आहे. कुमार सानू यांना जेव्हा मंचावर बोलवायचं असतं, तेव्हा शाहरुख म्हणतो “हे तेच कुमार सानू आहेत, ज्यांचा आवाज किशोर कुमार यांच्याशी मिळतीजुळती आहे.” शाहरुखचा हा जुना व्हिडीओ पाहून चाहते फारच खुश झाले आहेत. त्याला 90 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. शाहरुखचे चाहते या व्हिडीओवर कमेंट करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छाही देत आहेत.

हे सुद्धा वाचा

पहा व्हिडीओ

वाढदिवसाच्या मध्यरात्री शाहरुख आवर्जून त्याच्या ‘मन्नत’ या बंगल्याच्या टेरेसवर जाऊन चाहत्यांना अभिवादन करतो. त्याच्या बंगल्याबाहेर असंख्य चाहत्यांची गर्दी जमलेली पहायला मिळते. बुधवारी मध्यरात्री शाहरुख टेरेसवर आला आणि त्याने नेहमीप्रमाणे आपल्या चाहत्यांसमोर हात जोडले, त्यांना फ्लाईंग किसेस दिले आणि आपली आवडती सिग्नेचर पोझ दिली. यावेळी देशभरातील चाहते मन्नतबाहेर शाहरुखची एक झलक पाहण्यासाठी उभे होते. भेटवस्तू, पुष्पगुच्छ, पोस्टर्स, मिठाई अशा अनेक गोष्टी चाहत्यांनी शाहरुखसाठी आणल्या होत्या. ही गर्दी नियंत्रित करण्यासाठी मन्नतबाहेर पोलीस बंदोबस्तही तैनात होता.

या भेटीनंतर शाहरुखने सोशल मीडियावर पोस्ट लिहित चाहत्यांचे आभार मानले. ‘इतक्या रात्री इथे येऊन तुमच्यापैकी अनेकांनी मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. हे अविश्वसनीय आहे. मी फक्त एक अभिनेता आहे. मी तुमचं थोडंफार मनोरंजन करू शकतो, याशिवाय दुसरी कोणतीच गोष्ट मला इतका आनंद देत नाही. तुम्हा सर्वांच्या प्रेमाच्या स्वप्नात मी राहतो. तुमचं मनोरंजन करण्याची परवानगी दिल्याबद्दल धन्यवाद’, अशा शब्दांत त्याने कृतज्ञता व्यक्त केली.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.