Shah Rukh Khan | ‘मन्नत’ बंगल्यात पाल येते का? विचारणाऱ्याला शाहरुखने दिलेलं उत्तर चर्चेत

अभिनेता शाहरुख खानने 'आस्क एसआरके' सेशनच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी नेटकऱ्यांनी त्याला काही चित्रविचित्र प्रश्नसुद्धा विचारले. मन्नत बंगल्यात पाल येते का, असा सवाल एका युजरने शाहरुखला केला. त्यावर किंग खानने दिलेलं उत्तर चर्चेत आलं आहे.

Shah Rukh Khan | 'मन्नत' बंगल्यात पाल येते का? विचारणाऱ्याला शाहरुखने दिलेलं उत्तर चर्चेत
Shah Rukh Khan MannatImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Sep 23, 2023 | 8:46 AM

मुंबई | 23 सप्टेंबर 2023 : बॉलिवूडचा किंग अर्थात अभिनेता शाहरुख खान अनेकदा ट्विटरच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधतो. ‘आस्क एसआरके’ या सेशनअंतर्गत चाहत्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची उत्तरं तो त्याच्याच अंदाजात देतो. शुक्रवारी त्याने ‘आस्क एसआरके’ या सेशनच्या माध्यमातून पुन्हा एकदा चाहत्यांना प्रश्नं विचारण्याची संधी दिली. शाहरुखने दिलेली मजेशीर उत्तरं अनेकदा चर्चेत येतात. असंच काहीसं शुक्रवारीही पहायला मिळालं. एका चाहत्याने शाहरुखला ‘मन्नत’ बंगल्याविषयी गमतीशीर प्रश्न विचारला. त्यावर शाहरुखने दिलेल्या उत्तराने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.

‘आज शुक्रवारची संध्याकाळ आहे आणि मी एकटाच आहे. त्यामुळे तुमच्यासोबत काही मिनिटं घालवण्याचा विचार केला. नंतर मला जवान हा चित्रपट पहायला जायचं आहे. हाहाहा’, असं म्हणत त्याने या सेशनची सुरुवात केली. एका नेटकऱ्याने शाहरुखला प्रश्न विचारला, ‘मन्नतमध्ये पाल येतात का?’ या प्रश्नाचं उत्तर किंग खानने त्याच्याच अंदाजात दिलं. ‘पाल तर नाही पाहिली पण फुलपाखरू खूप येतात. खूप सुंदर फुलपाखरू येतात आणि त्यांना फुलांवर बसलेलं पाहून लहान मुलांना खूप आवडतं’, असं उत्तर त्याने दिलं.

हे सुद्धा वाचा

यावेळी आणखी एका चाहत्याने शाहरुखला विचारलं, ‘जवानच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनपैकी काही पैसे दान करणार आहेस का?’ त्यावर उत्तर देताना ‘बादशाह’ने लिहिलं, ‘होय, कुटुंबातील सर्वजण म्हणत आहेत. आम्ही आमचे पार्टनर मीर फाऊंडेशनपासून त्याची सुरुवात करू. मी स्वत: एंटरटेनर असल्याने इतरांच्या चेहऱ्यावर हास्य पाहणं माझ्यासाठी सर्वांत समाधानकारक बाब आहे. आताच मी रेड चिलीजला सांगतो. कल्पनेसाठी धन्यवाद.’

आणखी एका युजरने शाहरुखला विचारलं, ‘अबरामने तुझा जवान हा चित्रपट पाहिला का?’ त्यावर शाहरुख म्हणाला, ‘बाप बाप होता है. नाही नाही फक्त मस्करी करतोय. त्याला माझे ॲक्शन सीन्स खूप आवडले. विशेषकरून क्लायमॅक्समधील सीन त्याला खूप आवडला.’

शाहरुखचा जवान हा चित्रपट 7 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला. यामध्ये त्याच्यासोबत नयनतारा, विजय सेतुपती, प्रियामणी, सान्या मल्होत्रा, दीपिका पादुकोण यांच्याही भूमिका आहेत. तर अभिनेता संजय दत्त यामध्ये पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत आहे. या चित्रपटाने प्रदर्शनाच्या 15 दिवसांतच तब्बल 937 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.