Shah Rukh Khan चा मुलगा अबराम याच्या नावातील ‘राम’चं महत्त्व काय ?
लहान मुलगा अबराम याच्या नावाचं महत्त्व सांगत किंग खान याने सांगितलं 'राम'चं महत्त्व... पत्नी गौरी खान हिचा उल्लेख करत अभिनेता म्हणाला...
मुंबई | अभिनेता शाहरुख खान याने अनेक दमदार सिनेमांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. शाहरुख खान आज फक्त बॉलिवूडचाच बाहशहा नाही तर, संपूर्ण जगाचा किंग खान आहे. शाहरुख खान कायम त्यांच्या रॉयल आयुष्यामुळे तर चर्चेत असतोच. पण कुटुंबावर असलेल्या प्रेमामुळे देखील किंग खान याला अनेक प्रश्न विचारण्यात येतात. शाहरुख पत्नी गौरी खान, मुलगी सुहाना खान, मुलगा आर्यन खान आणि अबराम खान यांच्यावर प्रचंड प्रेम करतो. किंग खान याच्या दोन मुलांच्या नावापेक्षा लहान मुलगा अबराम याच्या नावाचं खासं महत्त्व आहे. एका मुलाखतीत अभिनेत्याने अबराम नावाचं अर्थ सांगितलं.
किंग खान याचा लहान मुलगा अबराम याच्या नावात ‘राम’ आहे आणि मुलाच्या नावात असलेल्या ‘राम’ शब्दाचा अर्थ देखील अभिनेत्याने चाहत्यांना सांगितला. शाहरुखने सांगितले की, मुलाचं नाव पैगंबर इब्राहिम यांच्या नावावर ठेवण्यात आलं आहे. मुस्लीम धर्मात पैगंबर इब्राहिम यांचं फार मोठं स्थान आहे.’
पुढे अभिनेता म्हणाला, ‘माझी पत्नी हिंदू आणि मी मुस्लीम आहे… भारत देशात जसं वातावरण आहे, तसंच वातावरण माझ्या घरात देखील आहे. अनेक जण या गोष्टीमुळे माझ्यावर टीका करतात. पण मला माझ्या मुलांना समानता शिकवायची आहे. अशात अबराम आहे, म्हणजे इब्राहिम आणि राम म्हणजे हिंदू धर्मातील देवता आहेत…’ असं किंग खान म्हणाला..
फार कमी लोकांना माहिती आहे की, अबरामच्या नावात (AbRam) आर कॅपिटल आहे कारण त्यामध्ये हिंदू देवता राम यांचा संदर्भ आहे. शाहरुख याचा लहान मुलगा अबराम खान ९ वर्षांचा आहे. अनेक ठिकाणी अबराम वडील शाहरुख खान याच्यासोबत दिसतो. तर सोशल मीडियावर अबराम याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात.
शाहरुख याच्या तिन्ही मुलं लोकप्रिय स्टारकिड्स आहेत. सोशल मीडियावर तिघांचे अनेक फोटो आहेत. एवढंच नाही आर्यन आणि सुहाना देखील कायम लहान भाऊ अबराम याच्यासोबत फोटो पोस्ट करत असतात. तर सोशल मीडियावर अबराम याचे अनेक फॅनपेज आहेत. सध्या सर्वत्र शाहरुख खान आणि त्याच्या तीन मुलांची चर्चा रंगत आहे.
शाहरुख खान याच्या आगामी सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, किंग खान लवकरच ‘जवान’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमात किंग खान मुख्य भूमिकेत असणार आहे. एवढंच नाही अभिनेत्याचा ‘डंकी’ सिनेमा देखील तुफान चर्चेत आहे. शिवाय शाहरुख खान अभिनेता सलमान खान याच्या ‘टायगर ३’ सिनेमात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे.