मुंबई: बॉलिवूडचा किंग अर्थात अभिनेता शाहरुख खान सध्या ‘पठाण’ चित्रपटाच्या यशाचा आस्वाद घेत आहे. ‘व्हॅलेंटाइन डे’निमित्त त्याने ट्विटरच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधला. ‘आस्क एसआरके’ या सेशन अंतर्गत चाहत्यांनी शाहरुखला विविध प्रश्नं विचारली. यादरम्यान एका चाहत्याने ‘व्हॅलेंटाइन डे’चं औचित्य साधत किंग खानला खास प्रश्न विचारला. ‘तू व्हॅलेंटाइन डे निमित्त गौरी मॅडमला पहिलं गिफ्ट काय दिलं होतंस’, असा प्रश्न एका युजरने विचारला. त्यावर शाहरुखनेही लगेच उत्तर दिलं.
‘माझ्या आठवणीनुसार आता तर त्या गोष्टीला जवळपास 34 वर्षे झाली आहेत. कदाचित गुलाबी रंगाचे प्लास्टिकचे इअररिंग्स (कानातले) दिले होते’, असं उत्तर शाहरुखने दिलं.
शाहरुख आणि दीपिकाच्या ‘पठाण’च्या सेटवरील एक व्हिडीओसुद्धा नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये सेटवर शाहरुखचा मुलगा अबराम पहायला मिळतोय. यावरूनही एका ट्विटर युजरने शाहरुखला प्रश्न विचारला. ‘सर सेटवर अबराम काय करतोय? तो पठाणचा सहाय्यक दिग्दर्शक आहे का’, असं मजेशीर सवाल संबंधित युजरने केला. त्यावर किंग खाननेही त्याच्या अंदाजात उत्तर दिलं. ‘हाहाहाह.. नाही तो स्टायलिस्ट आहे’, असं त्याने लिहिलं.
If I remember correctly it’s been what 34 years now….a pair of pink plastic earrings I think… https://t.co/pRY2jxl41B
— Shah Rukh Khan (@iamsrk) February 14, 2023
शाहरुख खान आणि गौरीची पहिली भेट 1984 मध्ये एका कॉमन मित्राच्या पार्टीमध्ये झाली होती. त्यावेळी शाहरुख फक्त 18 वर्षांचा होता. शाहरुखने गौरीला पाहिलं आणि त्यानंतर त्याने मित्राला तिच्याबद्दल विचारलं. शाहरुखच्या मित्राने गौरीशी बोलण्याचा प्रयत्न केला, तेव्हा ती तिच्या बॉयफ्रेंडची वाट पाहत असल्याचं समजलं.
गौरीने शाहरुखच्या मित्रासोबत डान्स करणं टाळण्यासाठी बॉयफ्रेंडची वाट पाहत असल्याचं खोटं सांगितलं होतं. मात्र खरंतर ती तिच्या भावाची वाट पाहत होती. नंतर गौरीशी मैत्री झाल्यानंतर शाहरुखने एकदा तिला प्रपोज केलं. मात्र कुटुंबीयांना पसंत नसल्याने गौरीने त्याला पहिल्यांदा नाकारलं होतं. रिलेशनशिपपासून ब्रेक मिळावा यासाठी ती त्याला न सांगताच मुंबईला निघून आली होती. त्याचवेळी शाहरुखसुद्धा मुंबईत आला.
मुंबईत शाहरुख आणि त्याच्या मित्रांनी गौरीचा शोध घेतला. तेव्हा अखेर समुद्रकिनारी दोघांची भेट झाली. त्यावेळी पुन्हा एकदा शाहरुखने गौरीला प्रपोज केलं होतं. मात्र दुसऱ्यांदाही तिने नकार दिला. दुसऱ्यांदा प्रपोज केल्यानंतर वर्षभराने गौरी शाहरुखकडे आली. त्यावेळी शाहरुखच्या आईचं निधन झालं होतं. अखेर 25 ऑक्टोबर 1991 रोजी या दोघांनी लग्नगाठ बांधली.