शाहरुख खान याच्या मुलासोबत ऐश्वर्याची लेक आराध्याचं लग्न? फोटो पाहून संतापले चाहते
Shah Rukh Khan son Aryan Khan | आर्यन खान - आराध्या बच्चन यांच्या लग्नाचा फोटो पाहिल्यानंतर संतापले चाहते, दोघांचा 'तो' फोटो पाहिल्यानंतर तुम्ही देखील म्हणाल..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त आर्यन खान, आराध्या बच्चन यांच्या फोटोंची चर्चा...
सोशल मीडियावर कायम सेलिब्रिटींचे आणि त्यांच्या कुटुंबाचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. आता देखील बॉलिवूडचा किंग खान म्हणजे शाहरुख खान याचा मोठा मुलगा आर्यन खान आणि बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांची नात आराध्या बच्चन यांचे काही फोटो तुफान व्हायरल होत आहेत. व्हायरल होत असलेले फोटो एडिट करण्यात आले आहेत. फोटोंमध्ये आर्यन आणि आराध्या यांचं लग्न झाल्याचे दाखवण्यात आलं आहे. फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. फोटो पाहिल्यानंतर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. दोघांना लग्नाच्या कपड्यांमध्ये पाहून अनेकांनी कमेंट करत प्रतिक्रिया दिल्या आहेत.
आराध्या आणि आर्यन यांचे फोटो रेडीटवर एका युजरने पोस्ट केले आहेत. फोटोमध्ये आराध्या नवरीच्या रुपात, तर आर्यन नवऱ्या मुलाच्या रुपात दिसत आहेत. दोघांचे व्हायरल होत असलेले फोटो रेडिटवर पोस्ट करण्यात आले आहेत. एका फोटोमध्ये आराध्या आणि बिग बी दिसत आहेत, तर दुसऱ्या फोटोमध्ये आर्यन आणि आराध्या दिसत आहे.
सोशल मीडियावर फोटो व्हायरल होत असल्यामुळे नेटकरी कमेंट करत संताप व्यक्त करत आहेत. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘फोटो एडिट कणाऱ्यावर गुन्हा दाखल करा…’ अन्य एक नेटकरी म्हणाला, ‘अत्यंत लाजिरवाणं कृत्य आहे.’ सांगायचं झालं तर, काही महिन्यांपूर्वी अभिनेता अभिषेक बच्चन याने एका युट्यूबर विरोधात तक्रार दाखल केली होती. आराध्या हिच्या प्रकृतीबद्दल अफवा पसरवल्यामुळे अभिषेक याने न्यायालयाची मदत घेतली होती.
आर्यन खान याच्या रिलेशनशिपच्या चर्चा…
आर्यन खान याच्या आयुष्यात एका परदेशी मॉडेलची एन्ट्री झाल्याची चर्चा रंगली आहे. आर्यन एका ब्राझिलियन मॉडेलला डेट करत असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. मॉडेल दुसरी तिसरी कोणी नाहीतर, लारिसा बोन्सी आहे. लारिसा बोन्सी हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, तिने बॉलिवूडमध्ये देखील काम केलं आहे. शिवाय काही तेलुगू सिनेमात देखील लारिसा बोन्सी हिने काम केलं आहे.
आर्यन खान कायम त्याच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असतो. सध्या पहिली सीरीज स्टारडमची तयारी करत आहे. आर्यन खान याला अभिनयात रस नसून, लेखण, दिग्दर्शन क्षेत्रात किंग खानचा लेक करिअर करणार आहे… असं खुद्द शाहरुख खान म्हणाला आहे. किंग खान कायम मुलांबद्दल महत्त्वाच्या गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत असतो.