Shah Rukh Khan याचा मुलगा पुन्हा वादाच्या भोवऱ्यात, आर्यनचा ‘हा’ व्हिडीओ पाहिल्यानंतर संतापले नेटकरी
किंग खानच्या मुलाचा व्हिडीओ पाहून नेटकरी संतापत म्हणाले, 'वडिलांचे पैसे खर्च करण्याशिवाय आर्यन करतो तरी काय...', सर्वत्र आर्यन खान याच्या व्हिडीओची चर्चा...
Shah Rukh Khan son Aryan Khan : अभिनेता शाहरुख खान (shah rukh khan) सध्या त्याच्या ‘पठाण’ (pathan) सिनेमामुळे तुफान चर्चेत आहे. तर दुसरीकडे किंग खान याचा मुलगा आर्यन खान (aryan khan) एका व्हिडीओमुळे चर्चेत आला आहे. आर्यनचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. आर्यन याचं ड्रग्स प्रकरणात नाव आल्यानंतर तो कायम त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतो. शिवाय त्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. आर्यन कायम लोकांच्या निशाण्यावर असतो. आता देखील आर्यन खान याच्या वागणुकीवर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये आर्यन त्याच्या ॲटिट्यूडमुळे चर्चेत आला आहे. व्हिडीओमध्ये आर्यन त्याच्या रेंज रोव्हर कारमधून उतरतो. तेव्हा त्याठिकाणी उभे असलेले पापाराझी आर्यन याला थांबण्यासाठी विनंती करतात. पण आर्यन खान पापाराझींकडे दुर्लक्ष करत त्याच्या स्टाफसोबत निघून जातो. (aryan khan instagram)
View this post on Instagram
व्हिडीओमध्ये आर्यन याची वागणूक पाहून नेकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. शिवाय अनेकांनी आर्यनच्या व्हिडीओवर कमेंट करत त्याचा विरोध केला आहे. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘याच्यामध्ये एवढा ॲटिट्यूड आहे तरी कोणत्या गोष्टीचा…’, तर अन्य एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘वडिलांचे पैसे खर्च करण्याशिवाय आर्यन करतो तरी काय…’
एवढंच नाही तर आर्यन खान कधीच शाहरुख खान होवू शकत नाही… असं देखील अनेक नेटकरी म्हणाले आहे. सध्या सर्वत्र आर्यन याच्या व्हिडीओची चर्चा आहे. शाहरुख चाहत्यांची संख्या फार मोठी आहे, तर दुसरीकडे आर्यनला विरोध करणाऱ्यांची संख्या देखील फार मोठी आहे. व्हिडीओ व्हाययरल होत असल्यामुळे आर्यन पुन्हा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. (aryan khan social media)
आर्यन खान याच्या करियरबद्दल सांगायचं झालं तर, आर्यनला अभिनयात रस नाही. आर्यनला फिल्ममेकिंग आणि क्रिएटिव्ह गोष्टींमध्ये करियर करायचं आहे. त्यामुळे आर्यन याचं काम चाहत्यांना आवडतं का? हे आर्यनचा पहिला प्रोजेक्ट प्रदर्शित झाल्यानंतर कळेल. (aryan khan in bollywood)
तर शाहरुख खान याच्या लेकीबद्दल सांगायचं झालं तर सुहाना खान लवकरच ‘द अर्चिस’ सिनेमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे. झोया अख्तर यांच्या सिनेमातून सुहाना करियरची सुरुवात करणार आहे. सिनेमात सुहाना हिच्यासोबत अभिनेत्री जान्हवी कपूर हिची बहीण खूशी कपूर आणि महानायक अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा देखील अभिनयाला सुरुवात करणार आहे.