मुंबई : अभिनेता शाहरुख खान आणि अभिनेत्री दीपिका पादुकोन स्टारर ‘पठाण’ सिनेमाच्या प्रतीक्षेत चाहते आहे. चार वर्षांनंतर अभिनेता शाहरुख खान याची रुपेरी पडद्यावर पुन्हा पदार्पण करणार असल्यामुळे चाहत्यांच्या मनात उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. २५ जानेवारी २०२३ रोजी सिनेमा मोठ्या पडद्यावर दाखल होणार आहे. महत्त्वाचं म्हणजे सिनेमाची ॲडव्हान्स बुकिंग सुरु झाली आहेत. ॲडव्हान्स बुकिंगच्या पहिल्या दिवशीच सिनेमाने मोठा गल्ला जमा केला आहे. ॲडव्हान्स बुकिंगच्या पहिल्या दिवशी सिनेमाने जवळपास २ लाखांपेक्षा जास्त तिकिटांची विक्री झाली आहे. प्रदर्शनापूर्वी मोठ्या संख्येने तिकिटांची विक्री झाल्यामुळे सिनेमा बॉक्स ऑफिसवर किती कोटी रुपयांपर्यंत मजल मारेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
पठाण सिनेमाच्या हिंदी आणि तेलुगू भाषेतील तिकीटांची विक्री मोठ्या संख्येने झाली आहे. महत्त्वाचं म्हणजे ॲडव्हान्स बुकिंगच्या पहिल्या दिवशी तिकीटांची झालेली विक्री पाहाता सिनेमाला कोणत्याही वादाचा फरक पडत नसल्याचं स्पष्ट होत आहे. शाहरुख याला मोठ्या पडद्यावर पाहाण्यासाठी चाहते उत्सुक असल्याचं दिसून येत आहे.
#Pathaan *advance booking status at national chains… Update till Friday, 6 pm…
#PVR: 75,500
#INOX: 60,500
#Cinepolis: 35,500
Total tickets sold: 1,71,500All set for a MONSTROUS START. pic.twitter.com/oydQQOmWOI
— taran adarsh (@taran_adarsh) January 20, 2023
मीडिया रिपोर्टनुसार, सिनेमाने प्रदर्शनापूर्वी १४.६६ कोटी रुपयांचं कलेक्शन केलं आहे. दिल्ली याठिकाणी सिनेमाने ॲडव्हान्स बुकिंगमध्ये जवळपास १.७९ कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर मुंबई याठिकाणी १.७४ कोटी रुपयांची ॲडव्हान्स बुकिंग झाली आहे. शिवाय बंगळुरू, हैदराबाद, कोलकाता याठिकाणी देखील सर्वात जास्त ॲडव्हान्स बुकिंग झाली आहे.
मीडिया रिपोर्टने वर्तवलेल्या अंदाजानुसार, सिनेमा प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी ४० कोटी रुपयांची कमाई करु शकतो. तर शनिवार आणि रविवारी सिनेमा भारतात तब्बल १५० ते २०० कोटी रुपयांपर्यंत गल्ला गोळा करु शकतो. पठाणमुळे वाद निर्माण झाल्याने याचा फायदा हा चित्रपटालाच होताना दिसत आहे. आता भारतामध्ये काय प्रतिसाद या चित्रपटाला मिळतो हे पाहण्यासारखे ठरणार आहे
मीडियारिपोर्ट्स नुसार, ‘पठाण’ सिनेमातील ‘बेशर्म रंग’ गाण्यावर होणारा विरोध पाहता सेंसर बोर्डाने सिनेमातील काही सिनवर कात्री चालवली असून सिनेमात महत्त्वाचे बदल केले आहेत. सिनेमा २५ जानेवारी रोजी मोठ्या पडद्यावर दाखल होणार आहे.