पठाण सिनेमाचा ट्रेलर थेट बुर्ज खलीफावर; शाहरुख खान याच्या चाहत्यांचा उत्साह शिगेला
चार वर्षांनंतर शाहरुख खान बॉलिवूड पुन्हा पदार्पण करत असल्यामुळे चाहत्यांचा उत्साह शिगेला; 'पठाण' सिनेमाचा ट्रेलर बुर्ज खलीफावर प्रदर्शित झाल्यानंतर अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
मुंबई : अभिनेता शाहरुख खान सध्या ‘पठाण’ सिनेमामुळे चर्चेत आहे. ‘बेशर्म रंग’ गाण्यातील अभिनेत्री दीपिका पादुकोणच्या भगव्या बिकिनीमुळे सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. पण आता सिनेमा प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे. २५ जानेवारी रोजी सिनेमा मोठ्या पडद्यावर दाखल होणार आहे. सध्या शाहरुख खान सिनेमाच्या प्रमोशनमध्ये दरम्यान आहे. इंटरनॅशनल लीग टी-20 स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात किंग खानने पठाणचा अनेकदा उल्लेख केला होता.
सर्वत्र पठाण सिनेमाची चर्चा सुरु असताना. दुबई येथील बुर्ज खलीफावर पठाण सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. बुर्ज खलीफावर सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. सोशल मीडियावर सध्या फोटो आणि व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये रात्रीचे सुंदर दृश्य चाहत्यांना अनुभवता येत आहे.
View this post on Instagram
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे. शाहरुख खान बुर्ज खलीफावर प्रदर्शित करण्यात आलेल्या सिनेमाच्या ट्रेलरचा आनंद घेत आहे. शिवाय अभिनेत्या त्याची सिग्नेचर पोज देत चाहत्यांना घायाळ केलं. एवढंच नाही तर, यावेळी किंग खानने डान्स देखील केला. चार वर्षांनंतर शाहरुख खान बॉलिवूड पुन्हा पदार्पण करत असल्यामुळे चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे.
View this post on Instagram
मीडियारिपोर्ट्स नुसार, ‘पठाण’ सिनेमातील ‘बेशर्म रंग’ गाण्यावर होणारा विरोध पाहता सेंसर बोर्डाने सिनेमातील काही सिनवर कात्री चालवली असून सिनेमात महत्त्वाचे बदल केले आहेत. सिनेमा २५ जानेवारी रोजी मोठ्या पडद्यावर दाखल होणार आहे.
‘पठाण’ सिनेमातून शाहरुख तब्बल चार वर्षांनी पुन्हा पदार्पण करणार असल्यामुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सिनेमात दीपिका आणि शाहरुख सोबतच अभिनेता जॉन अब्राहम देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.