Dunki Review : कधी हसवणारा, कधी रडवणारा.. कसा आहे शाहरुख खानचा ‘डंकी’?

अभिनेता शाहरुख खानचा 'डंकी' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहिलेल्यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. राजकुमार हिरानी दिग्दर्शित या चित्रपटाला प्रेक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.

Dunki Review : कधी हसवणारा, कधी रडवणारा.. कसा आहे शाहरुख खानचा 'डंकी'?
Dunki Movie ReviewImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Dec 21, 2023 | 12:48 PM

मुंबई : 21 डिसेंबर 2023 | पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त.. ‘डंकी’ या चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर तो इतका दमदार असेल असं वाटलं नव्हतं. मात्र शाहरुख खानने आपल्याच डायलॉगने ही गोष्ट सिद्ध केली आहे. दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांच्यासोबत काम करण्यास कलाकार का इतके उत्सुक असतात, याची प्रचिती पुन्हा एकदा आली. पंजाबमधील एका गावात राहणाऱ्या काही मित्रांना लंडनला जायचं असतं. तिथे गेल्यानंतर आपली गरीबी मिटेल असं त्यांना वाटत असतं. त्यातल्या एकाला त्याच्या एक्स गर्लफ्रेंडला सोबत घेऊन जायचं आहे. तिला तिच्या पतीकडून सतत मारहाण होत असते. हे सर्व मित्र IELTS च्या परीक्षेची तयारी करतात, मात्र त्यांना इंग्रजी भाषा येत नाही. त्यानंतर हे डंकी फ्लाइट म्हणजेच अवैध पद्धतीने जाण्याचा प्रयत्न करतात. या प्रवासादरम्यान काय काय घडतं, त्याची कथा चित्रपटात पहायला मिळते.

कसा आहे चित्रपट?

शाहरुखचा ‘डंकी’ हा चित्रपट सुरुवातीपासून शेवटपर्यंत अत्यंत मजेशीर आहे. त्यातील एकही सीन रटाळवाणं वाटत नाही. संपूर्ण चित्रपटादरम्यान तो प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवतो. सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत कथेचा प्रवाह अत्यंत योग्य आहे. कधी ही कथा तुम्हाला हसवते, कधी रडवते तर कधी थक्क करते. चित्रपटात शाहरुख हा मोठा कलाकार असला तरी इतर प्रत्येक कलाकाराला समान संधी मिळाली आहे. त्यामुळे कोणीच कोणावर वरचढ ठरत नाही. एक-एक भूमिका प्रेक्षकांशी एक नातं जोडू पाहते आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे हा चित्रपट तुम्ही तुमच्या संपूर्ण कुटुंबासोबत पाहू शकता.

अभिनय

या चित्रपटात शाहरुख पुन्हा एकदा बॉलिवूडचा किंग ठरला आहे. त्याचसोबत इतरही भूमिकांना स्क्रीनवर आपली छाप पाडण्यासाठी पुरेशी संधी मिळाली आहे. चित्रपटात तरुणपणीचा आणि म्हातारपणीचा.. असे दोन शाहरुख पहायला मिळतात. म्हातारपणातील शाहरुखचा मेकअप आणखी चांगला होऊ शकला असता, पण कथेच्या प्रवाहात ती गोष्ट तितकी महत्त्वाची वाटत नाही. अभिनेत्री तापसी पन्नूने नेहमीप्रमाणे दमदार काम केलं आहे. शाहरुखसोबत तिची जोडी खूप चांगली वाटते. म्हातारपणाच्या भूमिकेत तिनेही कमाल अभिनय केला आहे.

हे सुद्धा वाचा

अभिनेता विकी कौशलने ही गोष्ट पुन्हा एकदा सिद्ध केली की छोट्याशा भूमिकेतूनही तो आपली मोठी छाप प्रेक्षकांवर सोडू शकतो. संपूर्ण चित्रपटात तो तुम्हाला हसवतो आणि रडवतोसुद्धा. अभिनेता विक्रम कोच्चरनेही जबरदस्त अभिनय केला आहे. चित्रपटात तो सर्वांपेक्षा वेगळा वाटतो आणि प्रेक्षकांची मनं जिंकून जातो. अनिल ग्रोवर, बोमन इराणी यांनीसुद्धा त्यांच्या भूमिकांना योग्य न्याय दिला आहे.

दिग्दर्शन

राजकुमार हिरानी यांच्या दिग्दर्शनाची एक वेगळीच शैली आहे. त्यामुळे चित्रपटाची कथा किंवा दिग्दर्शन यांच्यापेक्षा शाहरुख वरचढ ठरत नाही. याच कारणामुळे चित्रपटात योग्य समतोल साधला गेला आहे. हिरानी यांची कथा सांगण्याची पद्धत भावनिक आहे आणि प्रेक्षक त्या कथेशी जोडले जातात. राजकुमार हिरानी यांच्या उत्तम चित्रपटांमध्ये डंकीचाही समावेश होईल.

संगीत

प्रीतमचं संगीत या चित्रपटाला लाभलं असून त्यातील ‘निकले थे कभी हम घर से’ हे गाणं जेव्हा जेव्हा ऐकायला मिळतं, तेव्हा डोळे पाणावतात. अमन पंत यांनी पार्श्वसंगीताचंही काम उत्तम केलंय.

मुकेश छाब्रा यांनी चित्रपटात कमालिची कास्टिंग केली आहे आणि याच कारणामुळे डंकी हा चित्रपट इतका कमाल वाटतो. शाहरुखसोबत इतर कलाकारांनी टिकावं आणि त्यासोबत त्यांनीही आपली वेगळी छाप सोडावी, अशी गोष्ट साध्य करणं सहज शक्य नाही. ही किमया कास्टिंग डायरेक्टर आणि दिग्दर्शकांनी करून दाखवली. त्यात लेखकाचंही तितकंच योगदान आहे. एकंदरीत ‘डंकी’ हा चित्रपट अत्यंत दमदार आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.