‘ये कहानी मैंने शुरू की थी…मैं ही खत्म…’, शाहरुख खान स्टारर ‘डंकी’ सिनेमाचा दमदार ट्रेलर प्रदर्शित

Dunki Trailer : शाहरुख खान स्टारर 'डंकी' सिनेमाचा दमदार ट्रेलर प्रदर्शित... ट्रेलर चाहते सिनेमाच्या प्रतीक्षेत; सिनेमा 22 नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहात दाखल होणार आहे... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त मल्टी स्टारर 'डंकी' सिनेमाची चर्चा... ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित

'ये कहानी मैंने शुरू की थी...मैं ही खत्म...', शाहरुख खान स्टारर 'डंकी' सिनेमाचा दमदार ट्रेलर प्रदर्शित
Follow us
| Updated on: Dec 05, 2023 | 1:45 PM

मुंबई | 5 डिसेंबर 2023 : ‘पठाण’, ‘जवान’ सिनेमानंतर अभिनेता शाहरुख खान ‘डंकी’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून ‘डंकी’ सिनेमाची चर्चा तुफान रंगली आहे. सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. किंग खान याच्या अनेक सिनेमांमध्ये अभिनेत्याचं देशावर असलेलं प्रेम दिसलं. आता देखील शाहरुख खान याचं देशावर असलेलं प्रेम ‘डंकी’ सिनेमाच्या माध्यमातून पाहाता येणार आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ‘डंकी’ सिनेमाच्या ट्रेलरची आणि शाहरुख खान याची चर्चा रंगली आहे. सिनेमात शाहरुख खान ‘हार्डी’ नावाच्या भूमिकेत दिसणार. ट्रेलर पाहिल्यानंतर सिनेमाबद्दल चाहत्यांची उत्सुकता देखील शिगेला पोहोचली आहे.

सिनेमात शाहरुख खान याच्यासोबत अभिनेत्री तापसी पन्नू आणि अभिनेता विकी कौशल महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर सिनेमाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांच्या खांद्यावर आहे. राजकुमार हिरानी हे विनोदी आणि सामाजिक संदेश असलेल्या सिनेमा साकारण्यासाठी ओळखले जातात. ‘डंकी’ सिनेमातून देखील चाहत्यांना सामाजिक संदेश मिळाणार आहे… असं ट्रेलर पाहिल्यानंतर दिसून येत आहे.

हे सुद्धा वाचा

‘डंकी’ सिनेमाच्या ट्रेलरची सुरुवात शाहरुख खान याच्यापासून होते. अभिनेता ट्रेनमधून उतरल्यानंतर, स्वतःला आणि त्याच्या मित्रांना लंडनला पाठवण्यास प्रयत्न करताना दिसत आहे. हार्डी (शाहरुख खान) पंजाबमधील एका सुंदर गावात पोहोचतो. गावात त्याचे मित्र मनू, सुखी, बग्गू आणि बल्ली राहातात. अभिनेत्याच्या मित्रांचं एक स्वप्न असतं आणि ते म्हणजे लंडनला जाऊन आपल्या कुटुंबियांना चांगलं आयुष्य द्यायचं..

लंडन याठिकाणी जाण्यासाठी शाहरुख खान याच्या मित्रांच्या प्रयत्नांचा प्रवास दाखवण्यात आला आहे. लंडला याठिकाणी जाऊन आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्येकजण इंग्रजी शिकण्यासाठी धडपड करू लागतो. शिक्षक झालेले बोमन इराणी त्यांना यासाठी प्रशिक्षण देतात… अशात शाहरुख म्हणतो, ‘हिंदी भाषा येत नसताना परदेशी नागरिक भारतात राहू शकतात, तर आपल्याला इंग्रजी भाषा का बंधनकारक आहे…’ पुढे सिनेमात काय होतं.. हे सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर कळेल…

कधी होणार ‘डंकी’ सिनेमा प्रदर्शित?

ख्रिसमसच्या मुहूर्तावर ‘डंकी’ सिनेमा प्रदर्शित होणार आहे. सिनेमाची निर्मिती शाहरुख खानची प्रोडक्शन कंपनी ‘रेड चिलीज एंटरटेनमेंट’च्या बॅनरखाली गौरी खानने केली आहे. सिनेमा 22 नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहात दाखल होणार आहे. पण ‘डंकी’ आणि ‘सालार’ सिनेमामध्ये कांटे की टक्कर असणार आहे. ‘सालार’ सिनेमात अभिनेता प्रभास मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.