Jawan ने चौथ्या दिवशी रचला विक्रम; शाहरुख खान पुन्हा ठरला बॉक्स ऑफसीचा ‘किंग’

Jawan | 'जवान' सिनेमाचा व्यवसाय वाढता वाढता वाढे... प्रदर्शनानंतर चौथ्या दिवशी 'जवान' सिनेमाने मोडले सर्व रेकॉर्ड... रविवारी सिनेमाने कमावले इतके कोटी..

Jawan ने चौथ्या दिवशी रचला विक्रम; शाहरुख खान पुन्हा ठरला बॉक्स ऑफसीचा 'किंग'
Follow us
| Updated on: Sep 11, 2023 | 7:49 AM

मुंबई : ११ सप्टेंबर 2023 | अभिनेता शाहरुख खान पुन्हा बॉक्स ऑफिसचा ‘किंग’ ठरला आहे. यंदाच्या वर्षी २५ जानेवारी रोजी किंग खान स्टारर ‘पठाण’ सिनेमा प्रदर्शित झाला आणि सिनेमाने फक्त भारतात नाही तर जगभरात नवीन विक्रम रचले. ‘पठाण’ सिनेमा यशाच्या शिखरावर असताना शहरुख खान याच्या ‘जवान’ सिनेमाची चर्चा सुरु होती. ‘जवान’ सिनेमा ७ सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला आणि सिनेमाने फक्त चार दिवसांमध्ये सर्व सिनेमांचा रेकॉर्ड मोडला. महत्त्वाची गोष्ट म्हणजे शनिवार – रविवार असल्याचा सिनेमाला मोठा फायदा झाला. सध्या सर्वत्र शाहरुख खान याच्या ‘जवान’ सिनेमाची चर्चा रंगत आहे. ‘जवान’ सिनेमाने अनेक हीट सिनेमांना मागे टाकलं आहे. सिनेमाच्या रविवारच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत.

‘जवान’ सिनेमाबद्दल असलेली क्रेझ सध्या चाहत्यांमध्ये दिसून येत आहे. बॉक्स ऑफिसवर सिनेमा तुफान कमाई करताना दिसत आहे. पण चौथ्या दिवसाच्या कमाईचे आकडे थक्क करणारे आहेत. रिपोर्टनुसार,’जवान’ सिनेमाने चोथ्या दिवशी तब्बल ८२ कोटी रुपयांचा कमाई केली आहे. चार दिवसांमध्ये रविवारी सिनेमाने सर्वात जास्त कमाई केली आहे.

‘जवान’ सिनेमाची कमाई

पहिला दिवस – ७५ कोटी दुसरा दिवस – ५३. २३ कोटी तिसरा दिवस – ७७.८३ कोटी चौथा दिलस- ८२ कोटी (सुरुवातीचे आकडे)

‘जवान’ने भारतात धुमाकूळ घातला असून शाहरुखची क्रेझ जगभरात पाहायला मिळत आहे. अवघ्या तीन दिवसांत ‘जवान’ ४०० कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सज्ज झाला आहे. ‘जवान’ सिनेमाने आतापर्यंत जगभरात ३८४.६९ कोटींची कमाई केली आहे. शाहरुख खान याच्या चाहत्यांची संख्या फक्त भारतात नाही तर साता समुद्रा पार देखील आहे. शाहरुख खान याची एक झलक पाहण्यासाठी चाहते चित्रपटगृहात गर्दी करत आहेत.

अभिनेता शाहरुख खान स्टारर ‘जवान’ सिनेमात अनेक अभिनेत्री महत्त्वाच्या भूमिकेतून चाहत्यांच्या भेटीस आल्या आहेत. अभिनेत्री दीपिका पादुकोण, नयनतारा याच्यासोबत सान्य मल्होत्रा, गिरीजा ओक, प्रियामणी, रिद्धी डोगरा, संजीता भटाचार्य, ऋतुजा शिंदे या अभिनेत्री महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. सध्या सर्वत्र ‘जवान’ सिनेमाची चर्चा रंगत आहेत.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.