Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तिसऱ्या आठवड्यात देखील ‘पठाण’चा बॉक्स ऑफिसवर बोलबाला; १६ दिवशी गल्ल्यात इतके कोटी जमा

शाहरुख खान स्टारर पठाणची सर्वांवर क्रेझ... सिनेमा बॉक्स ऑफिसवर कमी कमाई करत असला तरी किंग खान याला पाहण्यासाठी चाहत्यांची धाव सिनेमागृहाच्या दिशेने...

तिसऱ्या आठवड्यात देखील 'पठाण'चा बॉक्स ऑफिसवर बोलबाला; १६ दिवशी गल्ल्यात इतके कोटी जमा
pathaan
Follow us
| Updated on: Feb 10, 2023 | 12:57 PM

Pathaan Box Office Collection : अभिनेता शाहरुख खान (shahrukh khan) आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण (deepika padukone) स्टारर ‘पठाण’ सिनेमा बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करताना दिसत आहे. पठाण सिनेमा २५ जानेवारी रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला. प्रदर्शनानंतर पहिल्या तीन दिवसांत सिनेमाने बॉक्सऑफिसवर अनेक रेकॉर्ड मोडले. त्यानंतर शनिवार – रविवार असल्यामुळे सिनेमाच्या कमाईत मोठी वाढ झाली. पहिल्या, दुसऱ्या आठवड्यात कमालीची कमाई करणारा ‘पठाण’ सिनेमा तिसऱ्या आठवड्यात देखील बॉक्स ऑफिसवर कायम आहे. शिवाय १६ व्या दिवसानंतर  सिनेमा किती कोटी रुपयांपर्यंत मजल मारेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सध्या सर्वत्र सिनेमाच्या कमाईची चर्चा सुरु आहे.

पठाण सिनेमाची १६ व्या दिवसाची कमाई

पठाण सिनेमाने प्रदर्शनानंतर बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी ५५ कोटी रुपयांची कमाई केली होती. आता मिळालेल्या माहितीनुसार सिनेमाने १६ व्या दिवशी ६ कोटी रुपयांचा गल्ला जमा केला आहे. बॉक्स ऑफिसवर सिनेमाची कमाई कमी होत असली तरी, किंग खान याला पाहण्यासाठी चाहते सिनेमागृहात गर्दी करत आहेत. पठाण सलग १६व्या दिवशी बॉक्स ऑफिसवर कायम आहे. (pathan movie download)

किंग खान याच्या ‘पठाण’ सिनेमाने बॉलिवूडच्या अनेक हीट सिनेमांना मागे टाकलं आहे. ‘पठाण’च्या जगभरातील कमाईबद्दल सांगायचं झालं तर सिनेमाने आतापर्यंत ८७७ कोटी रुपयांची कमाई केली असून सिनेमा लवकरच १ हजार कोटी रुपयांचा टप्पा पार करेल असं सांगण्यात येत आहे. तर पठाण सिनेमाच्या भारतातील कमाईबद्दल सांगायचं झालं तर, तिसऱ्या आठवड्यात सिनेमा ५०० कोटी रुपयांची कमाई करेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा

चार वर्षांपूर्वी शाहरुख २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘झिरो’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आला. चार वर्षांनंतर अभिनेत्याला पुन्हा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक होते. महत्त्वाचं म्हणजे अभिनेत्याने ‘पठाण’ सिनेमाचं प्रमोशन देखील केलेलं नाही. पण ट्विटरवर #askSRK सेशनच्या माध्यमातून अभिनेता थेट चाहत्यांच्या संपर्कात होता.

शाहरुख खान याचा पठाण सिनेमा प्रदर्शनापूर्वी वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. अभिनेत्री दीपिका पादुकोण हिने ‘बेशर्म रंग’ गाण्यात घातलेल्या भगव्या बिकिनीमुळे वाद टोकाला पोहोचला होता. अनेकांनी सिनेमावर बहिष्कार टाकण्याची देखील मागणी घेतली. पण कोणत्याही सिनेमाचा पठाण सिनेमाच्या बॉक्स ऑफिस कोणताही परिणाम झालेला नाही. सिनेमाने प्रदर्शनानंतर तीन दिवसांत अनेक रेकॉर्ड मोडले. (pathan box office collection)

त्यानं सांगितलं की, देशमुखांना असं मारा की.., पोलिसांसमोर घुलेची कबुली
त्यानं सांगितलं की, देशमुखांना असं मारा की.., पोलिसांसमोर घुलेची कबुली.
'वाघ्या'ला ऐतिहासिक महत्त्व की दंतकथा? संभाजी भिडेंवर ठाकरेंचा घणाघात
'वाघ्या'ला ऐतिहासिक महत्त्व की दंतकथा? संभाजी भिडेंवर ठाकरेंचा घणाघात.
देशमुखांच्या छातीवर उडी अन् रक्ताची उलटी; आरोपींचा थरकाप उडवणारा जबाब
देशमुखांच्या छातीवर उडी अन् रक्ताची उलटी; आरोपींचा थरकाप उडवणारा जबाब.
संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार
संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार.
'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब
'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब.
पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड
पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड.
'कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर', शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचा इशारा
'कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर', शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचा इशारा.
मी नार्को टेस्टसाठी तयार, पण.. ; सतीश सालियान नेमकं काय म्हणाले?
मी नार्को टेस्टसाठी तयार, पण.. ; सतीश सालियान नेमकं काय म्हणाले?.
'तो' बलात्कार नाही, अलाहाबाद कोर्टाला फटकारल, 'राज्य महिला'कडून स्वागत
'तो' बलात्कार नाही, अलाहाबाद कोर्टाला फटकारल, 'राज्य महिला'कडून स्वागत.
धनंजय मुंडे यांनीच हे सगळं करायला सांगितलं; जरांगेंचा गंभीर आरोप
धनंजय मुंडे यांनीच हे सगळं करायला सांगितलं; जरांगेंचा गंभीर आरोप.