Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शाहरुख खान स्टारर ‘पठाण’ सिनेमाचा व्यवसाय वाढता वाढता वाढे…

शाहरुख खान स्टारर पठाण सिनेमा २५ जानेवारी रोजी प्रदर्शित झाला. प्रदर्शनापूर्वी वादाच्या भोवऱ्यात अडकलेला पठाण आता बॉक्स ऑफिसवर करतोछप्पर फाड के कमाई !... दुसऱ्या दिवशी पठाण सिनेमाच्या गल्ल्यात इतके कोटी जमा...

शाहरुख खान स्टारर 'पठाण' सिनेमाचा व्यवसाय वाढता वाढता वाढे...
शाहरुख खान स्टारर 'पठाण' सिनेमाचा व्यवसाय वाढता वाढता वाढे...
Follow us
| Updated on: Jan 27, 2023 | 10:14 AM

Pathaan Box Office Collection Day 2 : प्रदर्शनापूर्वी वादाच्या भोवऱ्यात अडकलेला ‘पठाण’ आता बॉक्स ऑफिसवर छप्पर फाड कमाई करताना दिसत आहे. सिनेमाला होणार विरोध पाहता पठाण सिनेमा बॉक्स ऑफिसवर मजल मारणार नाही, असा दावा अनेक ट्रे़ड एनालिस्ट्स यांनी केला. पण अनेकांचे दावे पठाण सिनेमाच्या यशासमोर फिके पडले आहेत. कारण प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी देखील बॉक्स ऑफिसवर पठाण सिनेमा अनेक रेकॉर्ड मोडताना दिसत आहे. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी सिनेमाने १०० कोटींपेक्षा जास्त गल्ला जमा केला. सध्या सर्वत्र पठाण सिनेमाच्या कमाईची चर्चा रंगत आहे.

पहिल्या दिवशी सिनेमाने भारातात ५७ कोटी रुपयांची बंपर ओपनिंग केली. दुसऱ्या दिवशी देखील पठाण सिनेमाचा डंका वाजताना दिसत आहे. ट्रे़ड एनालिस्ट्स रमेश बाला यांच्यानुसार, पठाण सिनेमाच्या हिंदी व्हर्जनने गुरुवारी ७० कोटी रुपयांचा गल्ला जमा केला. दोन दिवसांत पठाण सिनेमाच्या कमाईचा आकडा १२७ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. महत्त्वाचं म्हणजे KGF आणि KGF 2 सिनेमाचा रेकॉर्ड देखील पठाण सिनेमाने मोडला आहे.

हे सुद्धा वाचा

प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी पठाण सिनेमा जवळपास ६० ते ६५ कोटी रुपयांपर्यंत मजल मारेल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. पठाण सिनेमा प्रत्येक दिवशी नवा इतिहास रचत आहे. रमेश बाला यांच्यानुसार, पठाण सिनेमात जगभरात तब्बल २३५ कोटी रुपयाचं कलेक्शन केलं आहे. सध्या सर्वत्र पठाण सिनेमाची चर्चा आहे.

सध्या सर्वत्र शाहरुख खान स्टारर ‘पठाण’ सिनेमाची चर्चा आहे. पठाण देशभरात प्रदर्शनानंतर सिनेमा रोज नवे विक्रम रचत आहे. पठाण सिनेमाने काश्मीरमध्ये असा विक्रम रचला आहे, ज्याच्या प्रतीक्षेत खोऱ्यातील चाहते गेल्या ३२ वर्षांपासून होते.

पठाण सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर काश्मीरमध्ये पहिल्यांदा ३२ वर्षांनंतर चित्रपटगृह प्रेक्षकांनी खच्च भरला होता. देशातील प्रसिद्ध मल्टीप्लेक्स INOX Leisure Ltd याबाबतीत ट्विट करत महत्त्वाची माहिती दिली आहे. एवढंच नाही तर, त्यांनी शाहरुख खान याचे आभार देखील मानले आहे.

अभिनेता शाहरुख खान याने तब्बल चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुन्हा पदार्पण केल्यामुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सध्या सर्वत्र पठाण सिनेमाची जादू पाहायला मिळत आहे. सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्या दिवशी देखील अनेक संघटनांनी सिनेमाचा विरोध केला. पण त्याचा परिणाम बॉक्स ऑफिसवर झालेला नाही. शाहरुख खान याने चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पदार्पण केल्यामुळे चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. त्यामुळे विकेंडला सिनेमा बॉक्स ऑफिसवर किती कोटी रुपयांपर्यंत मजल मारेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी 10 एप्रिलला
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी 10 एप्रिलला.
'तुम्ही मुसलमांनाना का डॉमिनेट करता?,'शिरसाट आणि आव्हाडांमध्ये खडाजंगी
'तुम्ही मुसलमांनाना का डॉमिनेट करता?,'शिरसाट आणि आव्हाडांमध्ये खडाजंगी.
संतोष देशमुख हत्या प्रकरण; काय आहे सुनावणीचे अपडेट्स? इनसाईड स्टोरी
संतोष देशमुख हत्या प्रकरण; काय आहे सुनावणीचे अपडेट्स? इनसाईड स्टोरी.
पवारच आता दादांसोबत जातील... बच्चू कडूंच्या वक्तव्यानंतर चर्चांना उधाण
पवारच आता दादांसोबत जातील... बच्चू कडूंच्या वक्तव्यानंतर चर्चांना उधाण.
माझ्यावरचा हल्ला रोहित पवारांनीच केला; पडळकरांचा खळबळजनक आरोप
माझ्यावरचा हल्ला रोहित पवारांनीच केला; पडळकरांचा खळबळजनक आरोप.
'रात्री एक्स्प्रेस हायवेवर बोलवलं अन्...' दादांनी सांगितला 'तो' किस्सा
'रात्री एक्स्प्रेस हायवेवर बोलवलं अन्...' दादांनी सांगितला 'तो' किस्सा.
रायगडावरील वाघ्या कुत्र्यावरून वाद कायम, सरकार सोक्षमोक्ष करणार?
रायगडावरील वाघ्या कुत्र्यावरून वाद कायम, सरकार सोक्षमोक्ष करणार?.
माझ्या नावाची अडचण असेल तर पत्र लगेच मागे घेतो..; भास्कर जाधव चिडले
माझ्या नावाची अडचण असेल तर पत्र लगेच मागे घेतो..; भास्कर जाधव चिडले.
हातात तिरंगा अन् विधानभवन परिसरातील झाडावर 'त्याचं' आंदोलन, मागणी काय?
हातात तिरंगा अन् विधानभवन परिसरातील झाडावर 'त्याचं' आंदोलन, मागणी काय?.
'सौगात ए मोदी'चं आम्ही स्वागत करतो, पण..; राऊतांनी घेतली भाजपची बाजू
'सौगात ए मोदी'चं आम्ही स्वागत करतो, पण..; राऊतांनी घेतली भाजपची बाजू.