शाहरुख खान मुलाला वाचून दाखवायचा ‘महाभारत’; म्हणाला ‘कथेमध्ये बदल करायचो कारण…’
Shah Rukh Khan on Mahabharata | 'इस्लाम धर्मातील किस्से आणि महाभारत...', लहान मुलगा अबराम याला 'महाभारत' वाचून दाखवायचा शाहरुख खान, पण कथांमध्ये कसे करायचा बदल? म्हणाला..., किंग खान कायम मुलांबद्दल सांगत असतो....
अभिनेता शाहरुख खान कायम त्याच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असतो. शाहरुख कायम त्याच्या मुलांबद्दल देखील अनेक गोष्टी चाहत्यांना सांगत असतो. आता देखील शाहरुख आणि लहान मुलगा अबराम खान यांची चर्चा रंगली आहे. एका मुलाखतीत शाहरुख खान याने मोठा खुलासा केला होता. ‘मी माझ्या मुलाला महाभारत वाचून दाखवतो. पण कथेमध्ये थोडेफार बदल करतो..’ असं अभिनेता म्हणाला होता. तर शाहरुख कथेत काय बदल करायचा… याबद्दल देखील अभिनेत्याने मुलाखतीत सांगितलं होतं.
सांगायचं झालं तर, 2017 मध्ये शाहरुख खान याने ईदच्या मुहूर्तावर एक पत्रकार परिषद घेतली होती. तेव्हा अभिनेता म्हणाला होता, ‘माझ्या आई – वडिलांनी मला प्रत्येक धर्माबद्दल सांगितलं आहे. मी जेव्हा रामलीला पाहायला जायचो तेव्हा देखील ते आनंदी व्हायचे आणि जेव्हा मी ईदसाठी जायचो तेव्हा देखील ते आनंदी व्हायचे…’
‘माझा देखील एकच प्रयत्न असतो, ज्या प्रकारे माझ्या आई – वडिलांनी मला सर्व धर्मांचा आदर करायला शिकवलं आहे, त्याच प्रमाणे मी देखील माझ्या मुलांना सर्व धर्मांचा आदर करायला शिकवत आहे. मी गेल्या दीड वर्षांपासून महाभारत वाचत आहे. कारण मला कथा फार आवडतात.’
‘मी अबराम याला देखील महाभारत वाचून दाखवतो. पण कथांमध्ये थोडे फार बदल करतो, ज्यामुळे त्याला ऐकायला आनंद वाटेल. इस्लाम धर्मातील देखील जे किस्से मला माहिती आहेत, ते देखील मी अबराम याला रंजक करुन सांगतो. माझी एकच इच्छा आहे, माझ्या मुलांनी सर्व धर्मांबाबत शिकावं आणि सर्व धर्मांचा आदर करावा…’ असं शाहरुख म्हणाला होता.
एवढंच नाही तर एका शोमध्ये देखील शाहरुख खान याने हिंदू आणि मुस्लिम धर्माबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. किंग खान म्हणाला होता, ‘मी मुस्लिम आहे, माझी पत्नी हिंदू आहे आणि आमची मुलं पूर्ण हिंदूस्तान आहेत…’ अभिनेत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल देखील झाला होता.
शाहरुख खान याच्या आगामी सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, शाहरुख खान लवकरच ‘किंग’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमात शाहरुख खान याच्यासोबत सुहाना पहिल्यांदा स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे.