Shah Rukh Khan | ‘गोळी घालायची असेल तर घाला, पण..’; अंडरवर्ल्डसमोर झुकला नाही शाहरुख, दिग्दर्शकाचा खुलासा

शाहरुख खानचा 'जवान' हा चित्रपट पाहिल्यानंतर दिग्दर्शक संजय गुप्ता यांनी मोठा खुलासा केला. 90 च्या दशकातील शाहरुखने अंडरवर्ल्डसमोरही हार मानली नव्हती, असं त्यांनी म्हटलंय.

Shah Rukh Khan | 'गोळी घालायची असेल तर घाला, पण..'; अंडरवर्ल्डसमोर झुकला नाही  शाहरुख, दिग्दर्शकाचा खुलासा
Sanjay Gupta and Shah Rukh KhanImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Sep 09, 2023 | 2:19 PM

मुंबई | 9 सप्टेंबर 2023 : सध्या सर्वत्र शाहरुख खानच्या ‘जवान’ याच चित्रपटाची चर्चा आहे. अटली दिग्दर्शित या चित्रपटाने अवघ्या दोन दिवसांत 120 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे. प्रेक्षक-समिक्षकांकडून या चित्रपटाचं जोरदार कौतुक होत आहे. सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकजण सोशल मीडियावर शाहरुख आणि ‘जवान’साठी पोस्ट लिहित आहेत. अशातच ‘कांटे’, ‘काबिल’, ‘शूटाऊट ॲट लोखंडवाला’, ‘शूटाऊट ॲट वडाला’ आणि ‘जज्बा’ यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शक संजय गुप्ता यांनी शाहरुखबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे. संजय यांनी शाहरुख आणि अंडरवर्ल्डबद्दल हे ट्विट केलं आहे.

संजय यांनी ट्विट करत लिहिलं, ‘मी जवान हा चित्रपट पाहिला आणि त्यानंतर मला हा किस्सा सांगावासा वाटतोय. नव्वदच्या दशकात जेव्हा फिल्म इंडस्ट्रीतील सेलिब्रिटींवर अंडरवर्ल्डचा दबाव होता, त्यावेळी शाहरुख खान हा एकमेव कलाकार होता, ज्याने कधीच हार मानली नाही. गोळी घालायची असेल तर घाला, पण तुमच्यासाठी मी काम करणार नाही. मी पठाण आहे’, असं तो स्पष्ट म्हणायचा. तो आजही तसाच आहे. ‘जवान’ हा चित्रपट पाहिल्यानंतर फक्त संजय गुप्ताच नाही तर बॉलिवूड आणि टॉलिवूडमधल्या बऱ्याच कलाकारांनी शाहरुखचं कौतुक केलं. यात अभिनेत्री कंगना रनौत, टायगर श्रॉफ, महेश बाबू, दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांचाही समावेश आहे.

हे सुद्धा वाचा

संजय गुप्ता यांचं ट्विट

सोशल मीडियावर सध्या ‘जवान’चाच बोलबाला आहे. अशातच महिंद्रा ग्रुपचे अध्यक्ष आनंद महिंद्रा हेसुद्धा त्याच्याबद्दल ट्विट करण्यापासून स्वतःला रोखू शकले नाहीत. आनंद महिंद्रा यांनी नुकतंच ट्विट करत शाहरुख खानचं तोंडभरून कौतुक केलं आहे. आपल्या या ट्विटमध्ये आनंद महिंद्रा यांनी सुचवलं की शाहरुख खानला त्याच्या प्रचंड लोकप्रियतेमुळे आणि जगाच्या कानाकोपऱ्यातून लोकांना आपल्या चित्रपटाद्वारे एकत्र आणण्याच्या क्षमतेमुळे त्याला नैसर्गिक संसाधन म्हणून घोषित केलं जावं.

Non Stop LIVE Update
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.