“मी तुझी फॅन नाही तर..”, वैष्णो देवीच्या दर्शनासाठी पोहोचलेल्या शाहरुखच्या मागे लागली तरुणी; Video व्हायरल

शाहरूख खान माँ वैष्णोदेवीच्या दर्शनाला; पाठलाग करणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ आला समोर

मी तुझी फॅन नाही तर.., वैष्णो देवीच्या दर्शनासाठी पोहोचलेल्या शाहरुखच्या मागे लागली तरुणी; Video व्हायरल
Shah Rukh KhanImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Dec 13, 2022 | 9:26 AM

मुंबई: बॉलिवूडचा किंग अर्थात शाहरुख खान प्रत्येक धर्माचा आदर करतो. काही दिवसांपूर्वीच त्याने सौदी अरबमधील मक्का इथं उमराह केला. तर आता तो वैष्णो देवीच्या दर्शनाला पोहोचला आहे. वैष्णो देवीच्या दर्शनासाठी निघालेल्या शाहरुखचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओतील एका तरुणीने नेटकऱ्यांचं विशेष लक्ष वेधून घेतलं आहे. ही तरुणी शाहरुखच्या मागे पळत येताना दिसतेय.

शाहरुखने यावेळी काळ्या रंगाची हुडी आणि चेहऱ्यावर मास्क लावला होता. वैष्णो देवीचं दर्शन घेऊन त्याने आगामी ‘पठाण’ या चित्रपटाच्या यशासाठी प्रार्थना केली. दर्शन घेऊन परत येताना त्याच्या मागे एक मुलगी पळत आली. सोशल मीडियावर सध्या याच व्हिडीओची चर्चा सुरू आहे.

हे सुद्धा वाचा

सोशल मीडियावरील या व्हिडीओमध्ये ब्लॅक जॅकेट आणि व्हाइट ट्राऊजर्स घातलेली एक मुलगी शाहरुखला भेटण्यासाठी त्याच्या मागे धावत येते. मात्र ती त्याला भेटू शकत नाही. नंतर ती जोरात हाक मारत म्हणते, “सर मी तुमची कोणी मोठी फॅन नाही. मी एक कलाकार आहे.” यानंतर एका महिलेचा आवाज ऐकू येतो. ती म्हणते “इथून जा”. त्यानंतरही ती तरुणी पुन्हा शाहरुखला भेटण्याचा प्रयत्न करते. मात्र बॉडीगार्डमुळे ती भेटू शकत नाही.

शाहरुखचा ‘पठाण’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातील पहिलं गाणं नुकतंच प्रदर्शित झालं. यामध्ये शाहरुख आणि दीपिक पदुकोणच्या रोमान्सचा जबरदस्त तडका पहायला मिळाला. या गाण्यात दीपिकाचा आतापर्यंतचा सर्वांत बोल्ड अंदाज दिसला. पठाण हा चित्रपट येत्या 25 जानेवारी 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.