Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘त्याने माझ्यासोबत गेम…’, खेळाडूने बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीला दिला प्रेमात धोका, तिच्याकडून मोठा खुलासा

Love Life : खेळाडूने बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीला दिला प्रेमात धोका, पतीने देखील सोडली साथ... आज मुलीसोबत असं जगतेय आयुष्य; म्हणाली, 'त्याने माझ्यासोबत गेम...', सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याच्या चर्चा...

'त्याने माझ्यासोबत गेम...', खेळाडूने बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीला दिला प्रेमात धोका, तिच्याकडून मोठा खुलासा
Follow us
| Updated on: Jan 17, 2024 | 2:28 PM

मुंबई | 17 जानेवारी 2024 : ‘परदेस’ सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस आलेली अभिनेत्री महिमा चौधरी आज बॉलिवूडपासून दूर असली तरी, कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता महिमा तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. ‘डार्क चॉकलेट’ सिनेमाचं प्रमोशन करताना अभिनेत्रीने टेनिसपटू लिएंडर पेस याच्यासोबत असलेल्या नात्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त लिएंडर पेस आणि महिमा चौधरी यांच्या नात्याच्या चर्चा रंगत आहे. सांगायचं झालं तर, लिएंडर पेस आणि महिमा यांनी एकमेकांना अनेक वर्ष डेट केलं पण दोघांचं नातं लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही…

एका मुलाखतीत महिमा हिने लिएंडर पेस याच्यासोबत रिलेशनशिप आणि भूतकाळाबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. ‘ लिएंडर पेस याच्या आयुष्यात रिया पिल्लई हिची एन्ट्री झाल्यानंतर आमच्यात दुरावा निर्माणा झाला. लिएंडर पेस एक चांगला टेनिस खेळाडू आणि पण त्याने माझ्यासोबत फेअर गेम खेळला नाही…’

पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘जेव्हा मला कळलं लिएंडर पेस दुसऱ्या महिलेसोबत फिरत आहे… तेव्हा ती गोष्ट मला हैराण करणारी नव्हती… त्याच्या जाण्याने माझ्या आयुष्यात काहीही फरक पडला नाही. मी माझ्या आयुष्यात आणखी समजदार झाली.. मला असं वाटतं लिएंडर पेस याने रिया पिल्लई हिच्यासोबत देखील असंच केलं असेल…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली…

हे सुद्धा वाचा

महिमा चौधरी हिचं लग्न

लिएंडर पेस याच्यापासून विभक्त झाल्यानंतर अभिनेत्री 2006 मध्ये उद्योजक बॉबी मुखर्जी याच्यासोबत लग्न केलं. लग्नानंतर अभिनेत्री गोंडस मुलीला देखील जन्म दिला… पण बॉबी मुखर्जी याच्यासोबत देखील अभिनेत्रीचं नातं फार काळ टिकलं नाही… बॉबी मुखर्जी आणि महिमा चौधरी यांच्या लेकीचं नाव एरियाना असं आहे…

महिमा कायम लेकीसोबत सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. गेल्या अनेक वर्षांपासून महिमा बॉलिवूडमध्ये सक्रिय नाही.  पण तरी देखील अभिनेत्रीला चाहते विसरू शकलेले नाहीत. महिमा सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

महिमा हिच्या आगामी सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री लवकरच Emergency सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमता अभिनेत्री कंगना रनौत महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. चाहते देखील Emergency सिनेमाच्या प्रतीक्षेत आहेत.

कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा.
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं.
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली.
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल.
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना.
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया.