पत्नी मीराला घेऊन शाहीदकडून नव्या घराच्या बांधकामाची पाहणी, डुप्लेक्स अपार्टमेंटची किंमत धडकी भरवणारी!

बॉलिवूड अभिनेता शाहीद कपूर त्याच्या हॉट लूक आणि उत्तम कामासाठी ओळखला जातो. नुकताच तो त्याच्या पत्नीला घेऊन नव्या घराच्या बांधकामाच्या पाहणीसाठी गेला होता. पत्नी मीरा कपूर हिने तिच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे.

पत्नी मीराला घेऊन शाहीदकडून नव्या घराच्या बांधकामाची पाहणी, डुप्लेक्स अपार्टमेंटची किंमत धडकी भरवणारी!
Follow us
| Updated on: Oct 05, 2021 | 8:13 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहीद कपूर (Shahid Kapoor) त्याच्या हॉट लूक आणि उत्तम कामासाठी ओळखला जातो. नुकताच तो त्याच्या पत्नी मीरा कपूर हिला घेऊन त्याच्या नव्या घराच्या बांधकामाच्या पाहणीसाठी गेला होता. नविन घराचा फोटो पत्नी मीरा कपूर हिने तिच्या सोशल मीडियीवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये शाहीद कपूर आणि त्याची पत्नी त्यांच्या नव्याने तयार होणाऱ्या डुप्लेक्स अपार्टमेंटच्या पायऱ्यावर उभे आहेत.

पत्नी मिरा कपूरने शेअर केली इंस्टाग्राम स्टोरी

अभिनेता शाहीद कपूर त्याच्या पत्नीसमवेत नव्या घराच्या बांधकामाची पाहणी करण्यासाठी गेला होता. अभिनेता शाहीद कपूरची पत्नी मीरा कपूर हिने इंस्टाग्राम स्टोरीमध्ये फोटो शेअर करत याबद्दल माहिती दिली आहे. या फोटोमध्ये मीरा कपूरने हिरव्या रंगाचा ड्रेस घातला आहे. मीरासोबतच शाहीदनेसुद्धा मॅचिन्ग टी-शर्ट घातला आहे. हा फोटो शेअर करताना मीरा कपूरने ‘एका वेळी एक पाऊल’ असे सुद्धा लिहले आहे.

meera story

खिडकीतून थेट दिसणार समुद्र

शाहीद कपूरने 2018 मध्ये ही जागा विकत घेतली होती. साध्या या जागेवर शाहीद डुप्लेक्स अपार्टमेंटचे बांधकाम सुरू केले आहे. या अपार्टमेंटमधून समोर सुंदर असा समुद्र दिसणार आहे. हाती आलेल्या माहितीनुसार ह्या अपार्टमेंटची किंमत 56 कोटी रुपये सांगण्यात आली आहे. हा डुप्लेक्स अपार्टमेंट इमारतीच्या 42 आणि 43 व्या मजल्यावर आहे.

शाहीद सध्या ‘या’ ठिकाणी राहतोय

DNA ने दिलेल्या एका रिपोर्ट अनुसार अभिनेता शाहीद कपूरचे हे घर 4000 चौरस फुटांचे आहे. शाहीद कपूर आणि मिरा कपूर नेहमी या घराला भेट देतात. या घराचे अपडेट ते नेहमी सोशल मीडियावर टाकत असतात. सध्या ते त्यांच्या जुहूयेथील घरात त्यांच्या दोन्ही मुलांसोबत  राहतात.

शाहीद दिसणार या भूमिकेत

अलीकडेच त्याच्या एका चित्रपटाचे शूटिंग गोव्यात पूर्ण केले. शाहीद कपूर सध्या त्याच्या आगामी चित्रपटामच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. ‘जर्सी’हा त्याचा आगमी चित्रपट आहे. हा चित्रपट एका तेलुगु चित्रपटाचा रिमेक आहे. असे वृत्त आहे की या चित्रपटात त्याच्यासोबत मृणाल ठाकूर आणि पंकज कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

शाहिद कपूर बनणार महाभारतातील ‘कर्ण’

पिंकविलाच्या वृत्तानुसार, शाहिद कपूर दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्या आगामी चित्रपटात काम करू शकतो. हा चित्रपट महाभारतातील ‘कर्ण’ यांच्या जीवनावर आधारित असल्याचे सांगितले जात आहे. हा चित्रपट रॉनी स्क्रूवाला प्रॉडक्शन अंतर्गत बनवला जाणार आहे

इतर बातम्या :

पत्नी मीराला घेऊन शाहीदकडून नव्या घराच्या बांधकामाची पाहणी, डुप्लेक्स अपार्टमेंटची किंमत धडकी भरवणारी!

Video | छोट्या मुलाने शहनाज गिलला प्रश्न विचारले, समोर आलेले उत्तर पाहून ‘Sidnaaz’चे चाहते भावूक झाले!

Aryan Khan Drug Case: कुणी मेकअप आर्टिस्ट तर कुणी शिक्षक, पाहा आर्यन खानसोबत आणखी कोणकोण अटकेत?

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.