नक्कीच भांडून आलेत; शाहिद कपूरच्या पत्नीचं सर्वांसमोर वागणं पाहून नेटकरी नाराज

दिवाळी पार्टीतील शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीरा राजपूतचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये मीराचा फुगलेला चेहरा पाहून नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. पापाराझींसमोर फोटोसाठी पोझ देतानाही मीराना शाहिदला थेट दुर्लक्ष केलं. त्यावरूनही नेटकऱ्यांनी टीका केली आहे.

नक्कीच भांडून आलेत; शाहिद कपूरच्या पत्नीचं सर्वांसमोर वागणं पाहून नेटकरी नाराज
Shahid Kapoor and Mira RajputImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Nov 14, 2023 | 11:26 AM

मुंबई : 14 नोव्हेंबर 2023 | देशभरात दिवाळीचा उत्साह पहायला मिळतोय. सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत दिवाळी जल्लोषात साजरी केली जात आहे. अनेक सेलिब्रिटींच्या घरी दरवर्षी दिवाळीनिमित्त खास पार्ट्यांचं आयोजन केलं जातं. या पार्ट्यांना बॉलिवूडमधील सेलिब्रिटी ग्लॅमरस अंदाजात हजेरी लावतात. नुकताच अभिनेता शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीरा राजपूतचा असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये हे दोघं एका दिवाळी पार्टीला जाताना दिसत आहेत. मात्र पार्टीला जाण्यापूर्वी पापाराझींसमोर फोटोसाठी पोझ देताना मीराच्या चेहऱ्यावरील नाराजी स्पष्ट दिसून आली. तिने शाहिदकडेही दुर्लक्ष केलं. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत.

शाहिद कपूर आणि मीरा राजपूत एका दिवाळी पार्टीला एकत्र आले होते. यावेळी शाहिदने निळ्या रंगाचा पारंपरिक सूट परिधान केला होता. तर पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये मीरा खूपच सुंदर दिसत होती. दोघं जेव्हा गाडीतून बाहेर पडले, तेव्हा शाहिद मीरासाठी थांबला होता. मात्र मीरा त्याच्याकडे दुर्लक्ष करून पुढे निघून जाते. यावेळी शाहिदच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहण्यासारखे आहेत. त्यानंतर पुढे जाऊन दोघं फोटोसाठी एकत्र पोझ देतात. तेव्हासुद्धा आधी शाहिद मीराचा हात हातात घेण्याचा प्रयत्न करतो. मात्र मीरा शाहिदचा हात हातात न घेता त्याच्या दंडाभोवती हात धरून पोझ देते. फोटो काढल्यानंतर लगेचच ती त्याचा हात सोडून जाते. मीराचं हे वागणं काही नेटकऱ्यांना अजिबात पटलं नाही.

हे सुद्धा वाचा

‘हे दोघं नक्कीच भांडून आले असणार’, असं एकाने लिहिलं. तर ‘मीरा स्वत:च स्टार असल्यासारखी वागतेय. तिचा अॅटिट्यूड खूप चुकीचा आहे’, असं दुसऱ्या युजरने म्हटलंय. ‘मॅडमजींचा मूड जरा ठीक नाही वाटत’ असंही नेटकऱ्यांनी लिहिलं आहे. ‘दिवाळीत भांडणं झाली वाटतं’, असा अंदाज काहींनी व्यक्त केला.

पहा व्हिडीओ-

View this post on Instagram

A post shared by Voompla (@voompla)

7 जुलै 2015 रोजी शाहिदने मीराशी अरेंज्ड मॅरेज केलं. या लग्नसोहळ्याला फक्त कुटुंबीय आणि जवळचा मित्रपरिवार उपस्थित होता. मीरा आणि शाहिदला एक मुलगी आणि एक मुलगा आहे. मीरासोबतच्या लग्नाबद्दल शाहिद एका मुलाखतीत म्हणाला होता, “मी आता लग्नानंतर तिच्यावर प्रेम करू लागलोय. दररोज मला तिच्याशी प्रेम होतं. जेव्हा मी मीराला भेटलो, तेव्हा आम्ही जवळपास सात तास गप्पा मारत होतो. आम्ही लग्नाआधी फार वेळा डेटवर गेलो नाही. फक्त तीन-चार वेळा भेटलो होतो.”

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.