करीना कपूर हिच्या मोठ्या मुलाबद्दल एक्स-बॉयफ्रेंडचं मोठं वक्तव्य, ‘सैफ बाप झालाय पण…’

Kareena Kapoor Khan | 'सैफ बाप झालाय पण...', करीना कपूर हिच्या मोठ्या मुलाबद्दल असं काय म्हणाला अभिनेत्रीचा एक्स-बॉयफ्रेंड? सर्वांसमोर बेबोच्या एक्स-बॉयफ्रेंडने केलेलं 'ते' वक्तव्य आजही चर्चेत, फार कमी लोकांना माहिती आहे, तैमूर याच्याबद्दल करीनाचा एक्स-बॉयफ्रेंड काय म्हणाला होता?

करीना कपूर हिच्या मोठ्या मुलाबद्दल एक्स-बॉयफ्रेंडचं मोठं वक्तव्य, 'सैफ बाप झालाय पण...'
Follow us
| Updated on: Apr 01, 2024 | 9:01 AM

एक काळ असा होता जेव्हा अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री करीना कपूर खान यांचा मुलगा तैमूर अली खान याची सर्वत्र चर्चा असायची… तैमूर याच्या जन्मापासून त्याच्या भोवती फोटोग्राफर्सची चर्चा असते. आता देखील तैमूरची लोकप्रियता कमी झालेली नाही. आजही तैमूरची एक झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतात. करीना – सैफ यांचा मुलगा आणि क्यूटनेसमुळे तैमूर याची लोकप्रियता दिवसागणिक वाढत आहे. करीना – सैफ यांनी 2016 मध्ये तैमूरचं जगात स्वागत केलं. त्याच वर्षी करीनाचा एक्स बॉयफ्रेंड आणि अभिनेता शाहीद कपूर देखील बाबा झाला होता.

शाहीद कपूर याच्या मुलीचं नाव मीशा असं आहे. तेव्हा शाहीद आणि सैफ अली खान ‘रंगून’ सिनेमासाठी एकत्र काम करत होते. सिनेमाच्या प्रमोशनसाठी शाहीद आणि सैफ ‘इंडियन आयडल’ शोच्या सेटवर गेले होते. तेव्हा गायकाने गाणं गायिल्यानंतर बॉकग्राउंडमध्ये शाहिदची पत्नी आणि लेकीचा फोटो दाखवण्यात आला. तेव्हा दोघींना पाहिल्यानंतर अभिनेता भावूक झाला होता.

तेव्हा शाहिद याने करीना – सैफ यांचा मुलगा तैमूर याच्याबद्दल मोठं वक्तव्य केलं होतं. शाहिद म्हणाला होता, ‘एका मुलीचा बाप असल्याचा मला गर्व आहे. पालक झाल्यानंतर सर्वकाही बदलून जातं. नुकताच सैफ देखील बाप झाला आहे. पण त्याचा मुलगा तैमूर जेवढा क्यूट आहे, आजपर्यंत मी त्याच्या एवढं क्यूट बाळ पाहिलेलं नाही…’ असं देखील शाहिद कपूर म्हणाला होता.

शाहिद कपूर आणि करीना कपूर यांच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर, एक काळ होता जेव्हा बॉलिवूड आणि चाहत्यांमध्ये सर्वत्र दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चा रंगल्या होत्या. पण शाहिद कपूर – करीना कपूर यांचं नातं लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही. अखेर दोघांनी देखील विभक्त होण्याचा निर्णय घेतला. 2007 मध्ये शाहिद कपूर – करीना कपूर यांचं ब्रेकअप झालं. त्यानंतर शाहिद याने मीर राजपूत आणि करीना हिने सैफ याच्यासोबत लग्न केलं.

आज शाहिद कपूर – करीना कपूर एकमेकांपासून विभक्त झाले असले तरी, कोणत्या न कोणत्या कारणामुळे कायम चर्चेत असतात. सोशल मीडियावर देखील त्यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. दोघे देखील त्यांच्या खासगी आयुष्यात आनंदी आहे.

करीना कायम सोशल मीडियावर पती आणि दोन मुलांसोबत फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. पण शाहीद मुलांसोबत कधी फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत नाही. अभिनेता कायम पत्नी मीरा हिच्यासोबत फोटो पोस्ट करत चाहत्यांना कपल गोल्स  देत असतो. शाहीद आणि मीरा यांची जोडी बॉलिवूडच्या प्रसिद्ध आणि लोकप्रिय कपल्सच्या यादीत अव्वल स्थानी आहे.

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.