शाहिद कपूर याची लेकी आजीकडून शिकतेय डान्स; मीरा राजपूतने चाहत्यांना दाखवली खास झलक
वयाच्या ६ व्या वर्षी शाहिद कपूर याची लेक आजीकडून घेत आहे डान्सचे धडे; मिशाच्या डान्सची खास झलक मीरा राजपूतने दाखवली चाहत्यांना
मुंबई : अभिनेता शाहिद कपूर आणि पत्नी मीरा राजपूत कपूर बॉलिवूडच्या प्रसिद्ध कपलपैकी एक आहेत. दोघांच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. शाहिद बॉलिवूड प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आहे. शाहिद त्याच्या व्यस्त वेळापत्रकात कितीही व्यस्त असला तरी कुटुंबाला वेळ देतो. शाहिद आणि मीराचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. मीरा अभिनेत्री नसली तरी, शाहिद याची पत्नी म्हणून मिराने स्वतःचं स्थान भक्कम केलं आहे.
शाहिद पत्नी आणि दोन मुलांसोबत मुंबई एका आलिशान घरात राहतो. मिरा कायम घरातील फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते. आता मिराने चाहत्यांसोबत एक खास झलक शेअर केली आहे. मीराने एक फोटो इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. ज्यामध्ये शाहिद आणि मीरा यांची लेक मिशा डान्सचे धडे गिरवताना दिसत आहे.
शाहिद आणि मीरा यांची लेक कथक शिकत आहे. मीरा आजी निलीमा आझमी यांच्या कडून कथक शिकत आहे. निलीमा आझमी फक्त अभिनेत्याच नाही तर, दिग्गज कथक डान्सर देखील आहेत. मीराने शेअर केलेल्या पोस्टमध्ये निलीमा नात मिशाला कथक शिकवत आहेत. सध्या नात आणि आजीचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
रविवारी मिराने मिशा आणि निलीमा यांचा फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये मिशाचा चेहरा दिसत नसला तरी ती आजीकडून कथक शिकत असल्याचं चित्र दिसत आहे. आजीसोबत लेकीचा फोटो शेअर करत मिराने कॅप्शनमध्ये, ‘हिच योग्य वेळ आहे…’ असं म्हटलं आहे. सध्या फोटोमुळे शाहिद आणि मीरा पुन्हा चर्चेत आले आहेत.
मीरा आणि शाहिद कायम चाहत्यांना कपल गोल्स देत असतात. सिनेमा विश्वासोबत थेट संबंध नसतानाही शाहिदच्या आयुष्यात आलेल्या मीरानं त्याच्या विश्वात एक कायमस्वरूपी आणि भक्कम असं स्थान तयार केलं. कुटुंबाच्या सहमतीने शाहिद आणि मीराने लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्नानंतर दोघांचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले.
आता अनेक ठिकाणी शाहिद पत्नी मीरासोबत हजेरी लावतो. एवढंच नाही, तर अभिनेता कायम पत्नीची काळजी घेताना दिसतो. मीरा आणि शाहिद कायम त्यांच्या नात्यामुळे चर्चेत असतात. दोघे दिसले, की फोटोग्राफर्स त्यांना कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी सज्ज असतात.