शाहिद कपूरच्या घरात राहणार कार्तिक आर्यन; दर महिन्याचं भाडं ऐकून तुमचे डोळे विस्फारतील!

शाहिदने त्याच्या लग्नापूर्वी 2014 मध्ये जुहूमधील हे घर विकत घेतलं होतं. या इमारतीचं खास वैशिष्ट्य म्हणजे जुहू बीचपासून हे खूपच जवळ आहे. प्रणेता इमारतीमधील हे फ्लॅट 3 हजार 681 स्क्वेअर फूटवर पसरलेलं आहे.

शाहिद कपूरच्या घरात राहणार कार्तिक आर्यन; दर महिन्याचं भाडं ऐकून तुमचे डोळे विस्फारतील!
Shahid Kapoor and Kartik AaryanImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jan 20, 2023 | 8:20 AM

मुंबई: अभिनेता शाहिद कपूर काही महिन्यांपूर्वीच त्याच्या नव्या घरी राहायला गेला. त्यामुळे मुंबईतील जुहू इथलं त्याचं जुनं घर त्याने भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय घेतला. शाहिदने जुहू तारा रोड इथल्या प्रणेता बिल्डिंगमधील त्याचं घर अभिनेता कार्तिक आर्यनला भाडेतत्त्वावर दिलं आहे. या घरात आधी शाहिद त्याची पत्नी मिरा राजपूत आणि मुलं झैन, मिशा यांच्यासोबत राहायचा. जुहूमधील शाहिदच्या या घरातून समुद्राचं निसर्गरम्य सौंदर्य पहायला मिळतं. या घराचं भाडं देण्यासाठी कार्तिकने मोठी रक्कम मोजली आहे.

शाहिदने त्याच्या लग्नापूर्वी 2014 मध्ये जुहूमधील हे घर विकत घेतलं होतं. या इमारतीचं खास वैशिष्ट्य म्हणजे जुहू बीचपासून हे खूपच जवळ आहे. प्रणेता इमारतीमधील हे फ्लॅट 3 हजार 681 स्क्वेअर फूटवर पसरलेलं आहे. शाहिद आणि कार्तिक आर्यनमध्ये झालेल्या करारानुसार दरवर्षी या फ्लॅटचं भाडं सात टक्क्यांनी वाढवण्यात येणार आहे.

हे सुद्धा वाचा

समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या या फ्लॅटसाठी कार्तिक आर्यन सध्या दर महिन्याला साडेसात लाख रुपये भाडं देणार आहे. दुसऱ्या वर्षात हे भाडं सात टक्क्यांनी वाढून 8.02 लाख रुपये इतकं होणार आहे. तर तिसऱ्या वर्षात कार्तिकला 8.58 लाख रुपये प्रति महिना द्यावे लागणार आहेत. या घरासाठी त्याने 45 लाख रुपये सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून भरले आहेत.

शाहिदने जुलै 2018 मध्ये प्रभादेवी याठिकाणी नवीन ड्युप्लेक्स फ्लॅट विकत घेतलं होतं. हा फ्लॅट 8 हजार 625 स्क्वेअर फुटवर पसरलेला आहे. त्यावेळी शाहिदने तब्बल 55.60 कोटी रुपयांना हा फ्लॅट विकत घेतला होता. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात तो त्याच्या पत्नी आणि मुलांसह या नवीन घरात राहण्यासाठी आला.

शाहिदला आलिशान कार आणि बाईक्सची खूप आवड आहे. त्यामुळेच या नवीन घरात खास सहा पार्किंग स्लॉट देण्यात आले आहेत. इतकंच नव्हे तर या घराला 500 स्क्वेअर फूटची बाल्कनी आहे. समुद्राच्या देखाव्याचा आनंद घेता यावा यासाठी खास पद्धतीने शाहिद आणि मीराने ही बाल्कनी डिझाइन केली आहे.

शाहिदच्या घरात राहायला जाण्यापूर्वी कार्तिक वर्सोवा इथल्या अपार्टमेंटमध्ये राहायचा. 2019 मध्ये त्याने 1.60 कोटी रुपयांना हे घर विकत घेतलं होतं.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.